कंधार प्रतिनिधी :-माधव गोटमवाड
मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी आपण सर्व माय मराठीचे लेकरे २७ फेब्रुवारी या रोजी अगदी उत्साहाने साजरा करतो.
आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा महाराष्ट्र शासनाने २१ जानेवारी इ.स. २०१३ रोजी घेतला होता . तेव्हापासून आपण सर्व मराठी बांधव दि २७ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहाने हा दिन साजरा करतो .
कंधार आगारात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्ष म्हणून कंधार आगाराचे आगारप्रमुख श्री ए ए मडके साहेब व प्रमुख पाहुणे म्हणून श्री बळीराम पवार मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा मराठीचे शिक्षक तसेच पत्रकार कंधार लोकमतचे मारोती चिलपिपरे, कंधार मधील स्पर्धा परीक्षा संघर्ष करिअर अकॅडमीचे संचालक चंद्रकांत गीते सर, हृदयस्पर्शी मराठी व्याकरण चे संचालक माधव बंदुके सर, केसाळे सर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली होती. प्रमुख पाहुणे बळीराम पाटील पवार व बंदुके सर तसेच आगारप्रमुख यांनी मराठी भाषेचे महत्व सांगितले.
सकाळी ठीक दहा वाजता कंधार येथील बस स्थानक येथे कवी कुसुमाग्रज यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन केले. यावेळी आगारातील वाहतूक निरीक्षक जगदीश मंटगे, सवानी के जी केंद्रे, आगार लेखाकार डि के केंद्रे, आगारातील रोखपाल कोंडामंगले, कांदे सर, वाहतूक नियंत्रक पी जी काळे, एम एस मस्के उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संभाजी मठपती लिपिक यांनी केले. तसेच यावेळी बसस्थानकातील प्रवासी, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, शाळेचे विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.