गऊळ
शंकर तेलंग
केंद्रीय रस्ते विकास मंत्रालय देशासह राज्यातील रस्त्यावर करोडो रुपये खर्च करून छोटे छोटे गाव शहराला जोडत आहे.ज्या भागातील रस्त्यांचा विकास झाला की, त्या गावाचा विकास झपाट्याने होते.पण आजही कंधार तालुक्यातील पुढाऱ्यांच्या उदासिनतेमुळे कंधार तालुक्यातील गऊळ ते अंबुलगा या मार्गावरील रस्ते संपूर्ण खड्डेमय बनले असून या मार्गावर दररोज छोटे मोठे अपघात घडत असतात.या भागातील नादुरुस्त रस्ते आणि अपघात नेहमीचेच समिकरण आहे. नागरिकांचा नाहक बळी जातो. तरीही प्रशासन ढिम्म असते.
गऊळ ते अंबुलगा या रस्त्यावर अनेक खड्डे आहेत. या खड्ड्यात पाणी साचून दिवसेंदिवस वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण होत आहे. शाळकरी मुले, प्रवासी, शेतकरी, मजूर यांना ये जा करायासाठी त्रास होत आहे. जा मार्गाने शाळकरी विद्यार्थी सतत जात असतात. मात्र निकृष्ट दर्जाचा रस्ता असल्याने प्रवासी वाहने, चारचाकी, दुचाकी व इतर वाहनाने प्रावास करणाऱ्या चालकांना रस्त्यात खड्डे असल्याने तारेवरची कसरत करावी लागत आहे.
म्हणून बांधकाम विभागाने त्वरित दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करून मार्गावरील खड्डे बुजवावेत , अशी मागणी गावातील नारिकांतून होत आहे. त्याचबरोबर या खड्ड्यात सांडपाणी जमा होत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.या डासांमुळे वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण होत आहे.
याची दखल येथील स्थानिक प्रशासनाने घेऊन रस्ता दुरुस्तीचे काम लवकर करावे अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.