अहमदपूर ; प्रा भगवान आमलापूरे
अहमदपूर: येथील महात्मा फुले महाविद्यालय मराठी भाषा गौरव दिन व प्राचार्य डॉ वसंत बिरादार लिखित ‘कविता: सौंदर्यदृष्टी आणि समीक्षा’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा सुप्रसिद्ध कवी मुरहरी कराड पारकर यांच्या उपस्थित संपन्न होत आहे; या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. वसंत बिरादार हे राहणार आहेत. याप्रसंगी मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘आविष्कार’ भित्तीपत्रकाचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.

हा कार्यक्रम महात्मा फुले सभागृहात सकाळी ठीक अकरा वाजता सुरू होणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक प्रा. डॉ. अनिल मुंडे व प्रा. डॉ. मारुती कसाब यांनी केले आहे.

