कंधार प्रतिनिधी,
कंधार तालुक्यातील राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे प्रत्येक शासकीय कार्यालयात सावळा गोंधळ चालु आहे.पंचायत समिती कार्यालय हे ग्रामीण भागाचे महत्वाचे ठिकाण आहे .परंतु या कार्यालयात मनमानी व भ्रष्ट कारभार मोठ्या प्रमाणात चालत असतो.
ग्रामसेवक तर ग्राम पंचायतीमध्ये जातच नसल्याने गावातील नागरीकांनाच शहरात येऊन ग्रामसेवक कुठे आहे म्हणून शोधावे लागते.प्राथमिक आरोग्य केंद्रात ही हाच प्रकार चालु आसुन डाॕक्टर मुख्यालयी राहणे तर सोडाच परंतु आठ आठ दिवस अरोग्य केंद्रात येत नाहीत.
यातील अनेक डाॕक्टर शासकीय वेतन घेऊन खाजगी दवाखाने चालवत असतात.कृषी कार्यालययातील आनेक कर्मचारी हे वर कमईत मग्न झाले आहेत.ते शेतकऱ्यांना कसल्याच प्रकारचे मार्गदर्शन करत नसुन केवळ योजना कागदपत्री राबवल्याचे दाखवत आहेत.राशेन दुकान मालक ही सामान्य लाभार्थ्याची अर्थिक लुट करण्यात मग्न झाले आहेत.
शासनाच्या नियमाने प्रत्येक दुकानवर भाव व माहिती फलक लावणे गरजेचे आहे परंतु हे राशेन माफीया फलक लावत नसुन पावती न देता जास्तीचे पैसे घेत आहेत.तसेच शहरात नगर पालीकेचा स्वच्छतेचा मोठा घोटाळा आसुन यात राजकीय पुढारी व अधीकारी यांचे साटेलोटे असल्याने मनमानी चालु आहे.
शहरातील नागरीकांना विना फिल्टर व तुरटी,बाल्चिंग पावडर न टाकताच अशुद्ध पाणी पुरवठा केला जात आहे.अशा अनेक समस्यांचे निवेदन माजी सैनिक संघटनेच्या वतिने तहसीलदार
कार्तिकेयन एस. यांना दिले असल्याने तहसीलदार ही थक्क झाले असुन येणाऱ्या काळात या बाबीकडे लक्ष घालण्याचे अश्वासन कार्तिकेयन एस. यांनी दिले असल्याची माहीती माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुक्कलवाड यांनी दिली आहे.
यावेळी -जिल्हा अध्यक्ष बालाजी चुकलवाड तालुका उपाध्यक्ष शेख आजीज तालुका सचीव पोचीराम वाघमारे तालुका कार्य अध्यक्ष गोविंद सुर्यवंशी तालुका संघटक बापुराव कल्याणकर तालुका मिडीया प्रमुख उमाजी पंदलवाड बहादरपुरा सर्कल प्रमुख संभाजी कल्याणकर ई.माजी सैनिक उपस्थित होते.
प्रत्येक गावात जावुन नागरीकांशी संवाद साधणार-बालाजी चुकलवाड