जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई डॉ.केशवराव धोंडगे यांच्या शतकोत्तर वाढदिवसाच्या निमित्ताने घेतलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेचे भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या हस्ते बक्षिस वितरण

बारुळ ; विशेष प्रतिनिधी

श्री शिवाजी मोफत शिक्षण संस्था ता कंधार चे संस्थापक व संचालक डॉ केशवराव धोंडगे साहेब(जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी,माजी खासदार व आमदार)यांच्या शतकोतर वाढदिवसाच्या निमित्ताने “अर्थशास्त्र व ज्ञान प्रबोधिनी”आणि सांस्कृतिक आणि क्रीड़ा विभाग च्या मार्फत दि 27/01/22 रोजी सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यात यशस्वी झालेले गुणवंत खलील प्रमाणे आहेत.


1)शिंदे सांईप्रसाद संतोष
समानचिन्ह, भारताचे संविधान आणि 2500 रु रोख.
2)कु शिंदे ऋतुजा नारायण
सन्मानचिन्ह,विद्यर्थिनो जागृत व्हा! ले डॉ बी आर आम्बेडकरआणि2000रु रोख
3)जगताप संदेश केशव
सन्मान चिन्ह,शिवाजी कोन होता? ले गोविंद पानसरे आणि 1500 रु रोख
आणि उत्तेजनार्थ:-
1)गायकवाड़ संदीप उद्धवराव
2)गाढ़े दत्तराम व्यंकटी
3)वाघमारे शिवपुराण सुभाष
4)कु नाईक श्रद्धा संजयराव
हे विद्यर्थि यशस्वी झाले आहेत.

यशस्वी ज्ञानार्थीना काल बक्शीस वितरनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.संस्थेचे सचिव भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब,उपाध्यक्ष माधवराव पेटकर, प्राचार्य अनिल वट्टमवार बारूल मठाचे नामदेव महाराज आणि कला संपन्न दत्तात्रेय एमेकर यांच्या समर्थ हस्ते वितरित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा गजानन मोरे यांनी केले आणि आभार एस एम सोनटके यांनी केले.गुणगौरव कार्यक्रमात सर्व प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर क्रमच्यारी आणि विद्यर्थि उपस्थित होते.



प्रा चौथरे टी एस
ज्ञान प्रबोधिनी व
अर्थशास्त्र विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *