नांदेड :- अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजना (पीएमएफएमई), नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प या योजने अंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. या योजनेसाठी इच्छूकांना अर्ज करण्यासाठी किंवा अर्ज केले आहेत अशा लाभार्थ्यांना बँक कर्ज मिळविण्यासाठी अडचणी येवू देऊ नयेत. लाभार्थी शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना बँकानी तात्काळ कर्ज उपलब्ध करुन द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या.
या कार्यशाळेस मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा अग्रणी बँकेच व्यवस्थापक व इतर बँक अधिकारी, विविध विभागाचे शाखा व्यवस्थापक, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट व इतर शेतकरी उपस्थित होते. या कार्यशाळेत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प (स्मार्ट) या योजनेची माहिती प्रकल्प उपसंचालक (आत्मा) श्रीमती माधुरी सोनवणी यांनी सादरीकरणाद्वारे दिली.
या स्मार्ट योजनेमध्ये शेतकरी उत्पादक कंपनीला 60 टक्के पर्यत अनुदान मिळते. यासाठी बँक कर्ज घेणे ऐच्छिक असून 31 मार्च 2022 पर्यंत अर्ज करावेत. पीएमएफएमई योजनेत वैयक्तीक, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, बेरोजगार युवकांना देखील अर्ज करता येतो. यात नांदेड जिल्ह्यासाठी एक जिल्हा उत्पादन ओडीओपी हळद व इतर मसाले पदार्थ असून यासाठी नविीन उद्योग व विस्तारीकरणाचे तसेच नॉन ओडीओपी मध्ये विस्तारीकरणाचे प्रस्ताव सादर करता येतात. यामध्ये 35 टक्के व कमाल 10 लाखापर्यंत प्रक्रिया उद्योगांना अनुदान देता येते. त्या व्यतिरिक्त सामाईक पायाभुत सुविधा (35 टक्के अनुदान) बीज भांडवल, ब्रँडीग व विपणन (50 टक्के अनुदान) चा लाभ देखील या योजनेमध्ये घेता येतो.
नानाजी देशमूख कृषि संजिवनी योजनेत प्रकल्पामध्ये समाविष्ट शेतकरी गट व जिल्ह्यातील सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रस्ताव सादर करता येतो. यामध्ये अनुदानाची टक्केवारी 60 टक्के असून कमाल 1 कोटीपर्यंत प्रस्ताव सादर करता येतो. या योजनेतर्गंत प्रामुख्याने अवजारे बँक, गोदाम, वेअर हाऊस, शीतगृह, रायपनींग चेंबर, प्रक्रिया युनिट, बीजप्रक्रीया केंद्र, दाळमिल इ. घटकांचा लाभ मिळतो. या सर्व योजनांची अर्ज प्रक्रिया सुरु असून लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) रविशंकर चलवदे यांनी केले आहे.
या कार्यशाळेत जिल्ह्यातील परपंरागत कृषि विकास योजना (सेंद्रीय शेती) योजनेतील 5 सेंद्रिय गटांना सेंद्रीय प्रमाणीकरणाचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. एका गटामध्ये किमान 33 शेतकऱ्यांचा समावेश असून याप्रमाणे एकूण 172 प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. सोयाबीन बियाणेचा तुटवडा होवू नये व दर्जेदार बियाण गावस्तरावर उपलब्ध व्हावे, यासाठी उन्हाळी बियाणे लागवड करण्याचे आवाहन कृषि विभागाने केले होते. त्याअनुषंगाने नांदेड तालुक्यातील कासारखेडा येथील शेतकऱ्यांनी उत्कृष्ट सोयाबीन लागवड केल्याने बियाण्याबाबत गाव स्वयंपूर्ण झाले आहे. या शेतकऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आल