नांदेड जिल्ह्यात 3 व्यक्ती कोरोना बाधित तर 4 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 856 अहवालापैकी 3 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 3 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 769 एवढी झाली असून यातील 1 लाख 58 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 20 रुग्ण उपचार घेत असून यात 1 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 691 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे माहूर 2, धर्माबाद 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 3 कोरोना बाधित आढळले आहे.

आज नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 4, असे एकुण 4 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 3, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 5, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 13, असे एकुण 20 व्यक्ती उपचार घेत आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 79 हजार 756

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 60 हजार 10

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 769

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 58

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 691

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.36 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-08

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-20

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-1.

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *