कंधार
यावेळी तहसिलदार प्रतिनिधी संतोष कामठेकर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात असे नमूद केले की कंधार लोहा दोन्ही तालुक्यातील विविध बँकेत प्रलंबित असलेले पिक कर्ज लघु उद्योगासाठीचे कर्ज बचत गटाचे कर्ज तात्काळ मंजूर करून कर्ज वाटप करा..
दोन्ही तहसिलच्या ठिकाणी संजय गांधी निराधार समित्या स्थापन करून तात्काळ दिव्यांगांचे कार्यालय
तेलंगणा राज्याच्या धर्तीवर दिव्यांग, निराधार, विधवा यांना ३०००/- रुपये मानधन द्या व दिव्यांग, निराधार यांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करा व दिव्यांगाच्या मुलीच्या लग्नाला आर्थिक सहकार्य करा. यासह अन्य मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले
यावेळी मोर्चात शिवाजी दादा गेडेवाड जिल्हा संपर्कप्रमुख नांदेड ,शंकर दादा वड्डेवार युवा जिल्हाप्रमुख , साईनाथ बोईनवाड शहराध्यक्ष अ मुखेड , बालाजी भाऊ राठोड उपाध्यक्ष ,सचिन पाटील इंगोले राजमुद्रा संस्थापक अध्यक्ष, मुखेड शहाजी पाटील शिंदे राजमुद्रा सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष , बालाजी चुकलवार माजी सैनिक संघटना नांदेड जिल्हाध्यक्ष , नवनाथ वाघमारे , शेख दस्तगीर चांद भाई शेख जे प्रहार जिल्हा संघटक नांदेड गोविंद वडजे , युवा तालुका उपाध्यक्ष लोहा व कंधार लोहा मुखेड तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.