आता भरपूर झाले एकाच घरातील व्यक्तींना नगर आधक्ष,पंचायत समिती, जिल्हा परिषद, बॅंकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव ,आमदारकी, खासदारकी काय आहे हे समाज कुठे चालला आहे? नेमकी लोकशाही आहे की घराणेशाही मतदारांनी कार्यकर्त्यांनी आता जागे होण्याची गरज आहे एकाच घरातील व्यक्तींना संधी दिली जाते का ? बाकीच्या कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी का दिली जात नाही…बाकी कार्यकर्त्यांना फक्त नारे देण्यासाठी संतरंज्या उचलण्यासाठी स्टेज लावण्यासाठी आणि गाडीचा डोर उघडण्यासाठी आणि गाडीत बसवून डोर बंद करण्यासाठी च का …!
आम कार्यकर्त्यांनी टिकीट मागीतल कि तुम्ही पैशाची अट टाकता…जातीची अट टाकता…आणि उलट विचारता कि तुमच्या माघे किती जणता आहे ..? आम कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद पंचायत समिती लढवण्याची कुवत आसते…पण तुम्ही जणतेला पैशाच अमीष दाखवुन राजकाणाचा ऐक बोली बाजार लावला आहात…जेणेकरुन आम कार्यकर्त्यांनी कधीच आपल्या पुढे मान वर करुन नाही..आणि एखाद्या कार्यकर्त्यांनी मान वर करायचा प्रयत्न केला कि तुम्ही त्या कार्यकर्त्याला जवळ काखेत घेऊन सर्वजण मिळून त्यांची मान दाबता आणि तो आयुष्यभर जिवंत आसुन सुद्धा मेल्यात जमा समजुन ऐक प्रेत बनुन जगतो.
असे काही तत्वावर चलानारे नेतेनिष्ठ कार्यकर्ते आहेत तुमच्या साठी संसारावर पाणि ओतुन मुलाच्या शिक्षणावर पाणि ओतुन तुम्हाला तुमच्या लेकरांना मोठे करण्यासाठी हाड उगाळुन लावले…बरबाद झाले… पण तुम्ही त्यांचा कधी विचार केला नाही..कार्यकर्ता तुमच्या मागे फिरून मुलाला पाहीजे तसे शिक्षण दिले नाही.. म्हणून तो बेकार झाला आणि त्यांच्या बापाने लग्न करुन उस तोडायला पाठवले तेलंगणात मिरच्या तोडायला पाठवले पुणे मुंबई ला कंपनीत पाठवले बोरवेलच्या गाडीवर पाठवले आणि काही जणांनी मुंबई ला हामाली करायला पाठवले…
आणि तुमचे मुल शिक्षणात यशस्वी झाले नाही तर तुम्ही नगरसेवक बनवले नगर आधक्ष बनवले बॅंकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव बनवले पंचायत समिती चे सदस्य सभापती बनवले जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष बनवले…आणि आमदार पण बनवणार आणि खासदार पण बनवणार…. निवडणुकीत फक्त प्रस्थापितांच्याच घरच्या सिट काढण्यासाठी जात पात करत असतात… जर जाती धर्मावर च चालत असतील तर जे नेते ज्या समाजाचे आहेत त्या समाजातल्या कार्यकर्त्यांन साठी आपल्या मुलांना न टिकीट देता त्या कार्यकर्यांनच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या मुलाना तर देयायला पाहिजे टिकिट…पण हे आसे होत नाही…
गरिब ते गरिब श्रीमंत ते श्रीमंत… काहीही नाटक करायचे पण निवडणुकीत आपल्याच घरी सिट आणायची..!!!!
पण नेतेमंडळींनो जे आमच्या बापांनी संतरंज्या उचलल्या आमच्या बापांनी तुमच्या साठी हाड उगाळुन लावल…तुम्ही आमच्या बापांना दारुडे बनवले तुम्ही आमच्या बापांना गुलाम बनवुन हुकुमशाही चे धडे शिकवले..
तुम्ही आमच्या बापांना बंगल्यावर बाहेर रांगेत उभे केल तुम्ही आमच्या बापांना बंगले राखायला ठेवले तुम्ही आमच्या बापांना स्टेज लावायला लावले याचा मोबदला घेतल्याशिवाय आमच्या बापांना समाधान मिळणार नाही… म्हणून जिल्हा परिषद पंचायत चे टिकीट तुमच्या साठी ज्यांनी रक्त सांडले तुमच्या साठी ज्यांनी अंगावर गुन्हे घेतले तुमच्या साठी ज्यांनी उभा संसार कोलमोडुन टाकला आशा कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या मुलांना टिकिट देऊन मताचा रेट काडुन निवडुन आणावे .आमची तळमळ कशासाठी आहे ..एकमेव खालील कारणे…
पण तुम्ही पण चार पैशात मॅनेज होवु नये..ऐवढी काळजी घ्या आणि निवडणुका जाती धर्मावर लढवु नका…कारण तुम्ही जर सर्व धर्म समभावावर ऐकत्र ऐवुन जर केलात तर नक्कीच तुम्ही यश मिळवु शकता..आणि कंधार तालुका हा भ्रष्टाचार मुक्त करुन विकास कडे वाटचाल करु शकता.. फक्त ऐक वेळा आम्हाला आवाज दया.
परिवर्तनामधुन विकासाकडे नक्कीच वाटचाल करु….जय हिंद
आपलाच एक देशभक्त
बालाजी चुकलवाड,
जिल्हाध्यक्ष , माजी सैनिक संघटना नांदेड