कंधार
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माजी सैनिक नाना ऊर्फ रविकांत चिवळे यांच्या वतीने
हा पुरस्कार वितरण सोहळा नुकतेच भारत मातेची सेवा पुर्ण करुन आपल्या स्वगृही सेवानिवृत्त होवून आलेले माजी सैनिक नाना ऊर्फ रविकांत चिवळे मानसपुरीकर यांच्या संकल्पेतून आयोजित करण्यात आला आहे .
विरपत्नी कोमल हणमंतराव काळे उस्मानगर
यांनी कंधार तालुक्यातील महिलांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेता यावे यासाठी ठिकठिकाणी मेळावे घेतले तसेच गरजवंत महिलांचे प्रश्न घेवून नांदेड येथिल सबंधित अधिकारी व कार्यालयाची भेट घेवून असंख्य महिलांचे प्रश्न विरपत्नी कोमल हणमंतराव काळे यांनी मार्गी लावले आहेत.
दरम्यान महिलादिनी विविध क्षेत्रातील एकूण १० कर्तबगार महिलांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा उद्या ता. ८ मार्च रोजी दुपारी १:०० वाजता नगरेश्वर मंदिर मंगल कार्यालय कंधार येथे संपन्न होणार असल्याचे आयोजक नाना ऊर्फ रविकांत चिवळे , योग शिक्षक निळकंठ मोरे , सुंदर अक्षर शाळेचे दत्तात्रय एमेकर , गंगाप्रसाद यनावर , शंतनू कैलासे यांनी कळवले आहे.