दुभंगलेल्या मनांना जोडणारा दस्तावेज अभंग समतेचे – देविदास फुलारी

मुखेड – आज वाचन संस्कृती नष्ट होते आहे.या विवंचनेत आपण असताना,मुद्रित साहित्य निर्मिती कठीण झाली आहे.अस्या काळातही चंद्रकांत गायकवाड यांनी अभंग समतेचे या वैचारीक काव्यसंग्रहाची निर्मिती केली आहे. हे कौतुकास्पद आहे.नवा समाज,नवे प्रश्न,जगण्याचे संदर्भ शोधायला भाग पाडणारा हा काव्य संग्रह आहे.तो दुभंगलेल्या मनाला जाती, धर्म,पंथाचे जोखड झुगारून समता प्रस्थापित करण्याचा आग्रह धरतो.म्हणजे तो दुभंगत चाललेल्या मनांना जोडण्याचे स्वप्न पाहतो असे प्रतिपादन नरहर कुरुंदकर पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी यांनी मायबोली मराठी परिषद मुखेड आयोजित मराठी राजभाषा पंधरवाडा व सावित्रीबाई फुले स्मृतिदिन आयोजित चंद्रकांत गायकवाड लिखीत ‘अभंग समतेचे’पुस्तक प्रकाशन व प्रा.डॉ. रामकृष्ण बदने यांचा सन्मान सोहळा प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणुन बोलताना केले.


उद्घाटकीय वक्तव्य देताना मुखेड भूषण डॉ. दिलीप पुंडे म्हणाले की हा कार्यक्रम अनेक अंगांनी महत्त्वपूर्ण आहे.या कार्यक्रमात उपक्रमशील असलेल्या व सतत साहित्याच्या व समाजाच्या विविध चळवळीत धडपड करणाऱ्या प्रा.डॉ. रामकृष्ण बदने यांचा सत्कार येथे संपन्न होतोय त्यांच्या या यशाबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक कौतुक करतो.तसेच चंद्रकांत गायकवाड हा उपक्रमशील शिक्षक ज्यांनी कोरोनाच्या महामारीच्या काळात सगळे जग बंद असताना आपल्या विचारांचे कप्पे जागृत ठेवून सदरील काव्यसंग्रहाची निर्मिती केली. हा काव्यसंग्रह संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं महत्त्व विशद करतो. तसेच अनेक प्रश्नांची जाणीव करून देऊन त्या प्रश्नांची उत्तरे आपल्या समोर ठेवतो.त्यांच्या साहित्यिक लेखनास मनःपूर्वक शुभेच्छा


यावेळी दा.मा.बेंडे,डॉ दिलीप पुंडे,देविदास फुलारी,डॉ.नरसिंग वाघमोडे, प्रा.डॉ.शंकर विभुते,प्रा.डॉ. रामकृष्ण बदने, तुकाराम कारागीर या मान्यवरांच्या हस्ते अभंग समतेचे या चंद्रकांत गायकवाड लिखित काव्य संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.


या वेळी बोलताना मा.डॉ.नरसिंग वाघमोडे म्हणाले की मानवी मूल्यांची जोपासना करणारा काव्य संग्रह म्हणून याकडे पाहिले पाहिजे. कारण आजच्या घडीला मूल्यांची पायमल्ली होताना दिसते. म्हणून माणूसपण गळून पडल्याची प्रचिती येते. संवेदना लुळीपांगळी होते आणि भावनेला शब्द फुटतात परंतु कविता भावना विभोर होत नाही. शांत, संयमाने वाचकांच्या मनाचा, निश्चितच ताबा घेते असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.


प्रा.डॉ.शंकर विभुते म्हणाले की सुरेख,सुबक बांधणी आणि विवेकी, चिंतनशील वैचारिक कविता असून संत परंपरेचा वारसा वाढविण्यासाठी अभंग काव्य प्रकारात लेखन करून, वाचकांना नवी दृष्टी देणारा दस्तावेज म्हणून या साहित्यकृतीकडे पाहिले पाहिजे.
अध्यक्षीय समारोप करताना जेष्ठ साहित्यिक दा.मा. बेंडे यांनी मान्यवरांच्या विवेचनाचा मागोवा घेत घेत कविता साधी,सोपी,सरळ असून ती समाजप्रबोधनाचे काम करते.


वैगुण्य दाखवून थांबत नाही ती उपचार सुचवते.समता,स्वातंत्र्य, बंधुभावाची,मैत्रीची अपेक्षा करते.
यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचा उत्कृष्ट शिक्षक (ग्रामीण) पुरस्कार प्राप्त प्रा.डॉ.रामकृष्ण बदने यांचा सन्मान करण्यात आला.त्याला उत्तर देताना ते म्हणाले की हा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी माझी कर्मभूमी मुखेड व जन्मभूमी देवकरा यांनी दिलेल्या संधीमुळे,माझ्या संस्थेने व संस्थेतील सर्व सहकाऱ्यांनी केलेल्या प्रेमामुळे व मुखेड मधील पत्रकार व अन्य सामाजिक संस्थांनी वेळोवेळी दिलेल्या संधी मुळेच हा पुरस्कार मी प्राप्त करु शकलो.भविष्यात या पुरस्काराची आचारसंहिता पाळून ग्रामीण भागाच्या विकासासाठी माझ्या पद्धतीने प्रयत्न करेन असे मनोगत व्यक्त केले.या वेळी त्यांना देण्यात येणाऱ्या मानपत्राचे वाचन मानपत्र लेखक तथा मायबोली मराठी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक शिवाजी आंबुलगेकर यांनी केले.


यावेळी कवी चंद्रकांत गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करून कोरोना काळाचा फायदा घेऊन हा काव्यसंग्रह कसा जन्मास आला याबद्दल मनोगत व्यक्त केले.
या वर्षीपासून मायबोली मराठी परिषदेकडून मायबोलीचे सक्रिय कोषाध्यक्ष कालवश गौतम बोडके गुरुजींच्या स्मरणार्थ शिक्षक सन्मान देण्याचे निश्चित करुन हा पहिलाच पुरस्कार उपक्रम शील शिक्षक
तुकाराम कारागीर यांना देण्यात आला. यावेळी गौतम बोडके यांच्या अर्धांगिनी ह्या ही उपस्थित होत्या.


दै.लोकसंकेतचे संपादक प्रा.नामदेव यलकटवार यांनी पुस्तक प्रकाशन व सन्मान सोहळ्या निमीत्य काढलेल्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या अंकात भागवत घेवारे, रतन लांडगे, अनिता व्यवहारे,ना.सा.येवतीकर आणि तानाजी मालुसरे,दिलीप पुंडे,प्रा.डॉ. शशिकांत तोळमारे, प्रा.डॉ. विठ्ठल जायभाये, प्रा.डॉ. पुरुषोत्तम जून्ने यांनी लेखन केले.


सूत्रसंचलन मायबोलीचे विद्यमान सचिव एकनाथ डुमणे यांनी केले तर आभार मायबोलीचे सदस्य भारत जायभाये यांनी मानले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तदनंतर मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला. मायबोली मराठी परिषदेचे संस्थापक सचिव ज्ञानोबा जोगदंड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कार्यक्रम आयोजना पाठीमागची भूमिका विशद केली.


सदरील कार्यक्रमास प्राचार्य डॉ. शिवानंद आडकिणे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक संग्राम मस्‍कले, शेषराव गुरुजी डावकरे,गौतम भाऊ काळे,प्राचार्य ए.बी.गायकवाड,मुख्या.रमेश मैलारे,प्राचार्य दिलीप गायकवाड, उपप्राचार्य डॉ संजीव डोईबोळे,मायबोली परिषद कंधारचे अध्यक्ष डॉ. तायडे साहेब, व्यंकटराव तिगोटे, डॉ. राहुल मुक्कावार, नामदेव गायकवाड,पत्रकार यशवंत बोडके,दादाराव आगलावे,प्रा.डॉ. एकलारे, प्रा. डॉ गुरुनाथ कल्याण,प्रा.डॉ. प्रदीप कोटुरवार, प्रा. डॉ.संभाजी झंपलवाड, रमेश डावकरे, जय जोशी, रामराव टाकळे,विद्यानिकेतन परिवार व अन्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी मायबोली परिषदेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी आंबुलगेकर, संस्थापक सचिव ज्ञानोबा जोगदंड,विद्यमान अध्यक्ष प्रा.डॉ. राम कृष्ण बदने,विद्यमान सचिव एकनाथ डूमणे, प्रसिद्धीप्रमुख गजानन गेडेवाड,प्रकाश पवार, शरद जोगदंड, सुरेश जमदाडे,शिवाजी इंगोले,भारत जायभाये, नामदेव यलकटवार, शिवाजी कार्लेकर, शिवराज साधु,टाकळे सर,चंद्रकांत गायकवाड त्यांचे मित्र व आप्तेष्ट यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *