येवती येथील श्री शिवाजी विद्यालयाचा उपक्रम
मुखेड: (दादाराव आगलावे)
या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांमध्ये प्राणीमात्रांबद्दल प्रेम ,जैवविविधतेचे महत्त्व कळावे येवढेच नव्हे तर संत तुकाराम महाराजांनी त्याच्या अभंगातून भुतदया सांगीतली त्यांनी निसर्ग, प्राणी, पक्षी यांची जपवणूक करण्याचा सल्ला आपल्या अभंगातून दिला .म्हणून कोणताही जिव अन्न पाण्यावाचुन मरु नये व विद्यार्थ्यांनाही वेगवेगळ्या पक्ष्यांची निरिक्षणे व्हावी जैवविविधता टिकून राहावी हाच या उपक्रमा चा हेतू.
या आनंदायी उपक्रमात मध्ये शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी सुभेदार, हावगी पवाडे, रविंद्र तंगावार, प्रणिता मठ्ठमवार, कार्तिक स्वामी,विद्या भोपाळे, नंदकिशोर गव्हाणे, राजाराम गवलवाड, संतोष तळेगावे आदी शिक्षक ,इतर कर्मचारी व विद्यार्थींनी सहभाग नोंदवला. उपक्रमशील शिक्षक संतोष तळेगावे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.