मुखेड: दादाराव आगलावे
मुखेड पंचायत समिती सभाग्रहात
दि.३० मार्च रोजी परिवर्तन संस्था सुमठाणा अहमदपुर व महिला संवाद प्रतिष्ठाण मुखेड च्या वतिने जेष्ठ समाजसेविका शांताबाई येवतीकर यांच्या नेतृत्वाखाली जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.त्या वेळी डाॅ.दिलिप पुंडे बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पुजनानंतर करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षा संध्याताई जांभळे तर उदघाटक मराठवाडा भुषण डाॅ.दिलिप पुंडे
हे होते.
यावेळी कार्यक्रमास उपस्थित महिलांना शासकीय योजना व कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. याबरोबरच ग्रामीण भागात राहुन सामाजिक व राजकिय कार्यात यशस्वी झालेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मानही यावेळी
उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी डॉ. पुंडे म्हणाले की जागतिक महिला दिन हा महिलांचा हक्क मिळवणारा दिन आहे. आणि तो रोज साजरा व्हायला हवा यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल .आत्मविश्वास व त्याग यातूनच देशात राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर ,माता रमाई आंबेडकर यांनी वेगळा इतिहास निर्माण करून दाखवला पण आजची स्त्री अन्याय अत्याचाराचा दडकली जात आहे. पण महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण आजचा पुरुष हा मोठ्या प्रमाणात व्यसनात अडकलेला असून यामुळे महिलांवर अन्याय अत्याचार व संसार उध्वस्त होताना दिसत आहेत. यासाठी गावागावात दारूच्या विरोधामध्ये उभी बाटली – आडवी बाटली ही मोहीम राबवली पाहिजे. याबरोबरच मुला-मुलींमध्ये भेद न करता त्यांना शिक्षण द्या ज्याची कृती सुंदर असते त्याची मूर्ती सुंदर असते यासाठी कृती सुंदर होण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही असा विचार डॉक्टर दिलीप पुंडे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक
शांताबाई येवतीकर
यांनी केले.त्या
म्हणाल्या की स्वातंत्र्यपुर्व काळातही जगातल्या काही धाडसी महिलांनी अन्यायाच्या प्रतिकारासाठी घराबाहेर पडून मोर्चे, अंदोलने करून आपल्या मागण्या मंजूर करून घेतल्या. तो दिन म्हणजे ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून नोंद करण्यास भाग पाडले हा दिवस जगभरातील सर्व महिलांच्या स्मरणात रहावा यासाठी संबंध जगामध्ये महिलांनी जागतिक महिला दिन साजरा करावा असे त्या म्हणाल्या.
यावेळी गटविकास अधिकारी तुकाराम भालके,शांताबाई येवतिकर
उपजिल्हा रुग्णालयाच्या मालती वाघमारे, सरपंच उज्वलाबाई अरुणराव पत्रे, पी.के गायकवाड यांनीही आपला विचार मांडला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अश्विन येवतीकर, माधव लव्हटे, गोविंद वाडीकर, दामू जाहिरे, लक्ष्मण जाहिरे, उषा बनसोडे, मथुराबाई कांबळे, चतुराबाई शिकारे, सखुबाई वाघमारे, पदमीनबाई पोटफोडे, चंदरबाई गजलवाड, संघमित्रा गवळे, शांताताई मोरे, शिल्पा वाघमारे, सुषमा मामडे, शेख शाबिराबी मौलाखान, प्रेमलाबाई वाघमारे अादिंनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दत्ता तुमवाड यांनी केले तर शांताताई मोरे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.