माझ्यावर प्रेम करणाऱ्या नागरीकांनी मला काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले – दशरथ लोहबंदे


मुखडे:(दादाराव आगलावे)

पँथर पासून सुरवात केलीली बहुजन चळवळीला ५० वर्ष पूर्ण केलो आसून यात निराधार, गायरान पट्टे, सामान्यावर झालेल्य अन्यायाचा वाचा फोडण्यासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी मी प्रथम प्राधान्य दिलो त्या सोबतच माझ्यावर प्रेम करणाऱ्या नागरीकानी मला काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले त्यामुळे काम करू शकलो व या कामाची दखल यु ए ई ( दुबई ) देशानी घेऊन मला सन्मान केला असे प्रतीपादन जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे यांनी केले.


ते रत्नधाव फाऊंडेशन व महालाँड ग्रुप व दुबई सफर यांच्या वतीने जि.प. सदस्य दशरथराव लोहबंदे यांना जीवन गौरव पुरस्कार नुकताच देण्यात आला त्यानिमित्ताने मुखडे शहर संयोजन समितीच्या वतीने लोहबंदे यांचा नागरी सत्कार दि. ३१ मार्च रोजी शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर आयोजित करण्यात आले या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, प्रमुख पाहूने म्हणून माजी आमदार अविनाश घाटे, काँग्रेस सचिव श्रावन रॅपनवाड, तालुका अध्यक्ष भाऊसाहॆब पाटील मडलापुरकर, आर. पि. आय. जिल्हाध्यक्ष गौतम काळे, एन. डी. गवळे, कोंडदेव हटकर, काॅंग्रेसचे प्रवक्ते कोडगिरे, शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलवार, उपाध्यक्ष उत्तम अण्णा चौधरी, बिलोली येथील गंगाधर प्रचंड, माजी नगराध्यक्ष गणपत गायकवाड, डाॅ. रणजित काळे, माजी सभापती व्यंकट पांडवे,प. स. सदस्य उत्तम चव्हाण,त्रंबक सोनटक्के, नगरसेवक विनोद आडेपवार,बापुराव कांबळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती . पुरस्कार प्राप्त दशरथराव लोहबंदे याचा मा.आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, मा.आ.अविनाश घाटे,गौतम काळे,डॉ. श्रावण रँपनवाड,बापुराव कांबळे यांनी यथोचित सत्कार केला.

यावेळी पुढे बोलताना लोहबंदे म्हनाले की तालुक्यातील गोरगरीब नागरीकांचे प्रमाणिक पणे सेवा केल्यामुळे आपला सत्कार सातसमुंद पार झाला आहा माझा एकट्याचा सन्मान नसून तमाम तालुक्यातील नागरिकांचा सन्मान आहे. यावेळी बापूराव कांबळे जुन्नेकर,संजय कांबळे हादगाव,विनोद गजभारे, राहुल लोहबंदे, दिपक लोहबंदे, श्रावण नरबागे, रियाज शेख, गंगाधर सोंडारे, , गुंडेराव गायकवाड, लोकडु पाटील गाढवे , डाॅ. राहूल कांंबळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *