सामाजीक कार्यकर्त्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. वर्षाताई भोसीकर यांच्या पुढाकाराने फुलवळ येथे डिजीटल सदस्य नोंदणी अभियानास गती

कंधार

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या डिजीटल सदस्य नोंदणी अभियान 2022 अंतर्गत फुलवळ ता. कंधार येथे सदस्य नोंदणी अभियानास
सामाजीक कार्यकर्त्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. वर्षाताई भोसीकर यांच्या पुढाकाराने व प्रयत्नाने गती प्राप्त झाली आहे.

सामाजीक कार्यकर्त्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. वर्षाताई भोसीकर यांनी गेल्या अनेक दिवसापासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या डिजीटल सदस्य नोंदणी अभियान 2022 यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्य कले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेवून

नुकताच त्यांचा सन्मान नांदेड येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण ,तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नांदेड जिल्हा सह प्रभारी सौ. अर्चनाताई राठोड व काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष गोविंदराव मामा शिंदे नागेलीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता .

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या डिजीटल सदस्य नोंदणी अभियान २०२२ चा भाग म्हणून दि.६ एप्रिल रोजी फुलवळ येथे मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी साठी सौ. वर्षाताई भोसीकर यांनी पुढाकार घेतला.

यावेळी युवक काँग्रेस सर्कल प्रमुख वसंतराव पाटील घोरबांड, बसवेश्वर मंगनाळे,बापूराव मंगनाळे,भीमराव मंगनाळे,संजय मंगनाळे, लक्ष्मण गलपवाड,मन्मथ मेळगावे, सुशांत पवार,नवनाथ गलपवाड आदी सह गावातील मतदार महिला भगिनी व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *