फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
मन्याड खोऱ्याचा नादच खुळा , विविध क्षेत्रात सर्वदूर चर्चेत राहते वेळोवेळा.. असेच एक संजीवनी दूत म्हणून ओळखले जाणारे योग शिक्षक नीळकंठ मोरे यांनी कोरोना महामारीच्या काळापासून गुगलमीटच्या माध्यमातून ऑनलाईन योग वर्ग सुरुवात केले असून या योगवर्गाला कंधार शहरातीलच नाही तर अखंड महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून महिला , पुरुष योग साधक जुळले असून दररोज नित्यनेमाने भल्या पहाटे ऑनलाईन योगाचे धडे घेत आपापले आरोग्य निरोगी ठेवण्यात यशस्वी झाले आहेत.
मी योग शिक्षक नीळकंठ मोरे , मन्याड खोऱ्यातील मौजे पानशेवडी येथील भूमिपुत्र , पण सध्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कंधार शहरात वास्तव्यास असून मी गेली अनेक वर्षांपासून कंधार तालुक्यातील अनेक गावात भल्या पहाटे जाऊन प्रत्यक्ष ऑफलाईन योग शिबीरे घेतले.
त्या वर्गाला लहान थोरांसह आबालवृद्ध , महिला , पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होत असत.
गेली दोन वर्षांपासून आपण सर्वांनी अनुभवलेला कोरोना महामारी हा भयंकर काळ होता ,सर्वत्र भीतीचे वातावरण असताना covid - १९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता माझ्या डाव्या पायाचे चार ऑपरेशन झाले असल्याने मला बाहेर फिरता येणे शक्य नव्हते. शक्य झालेही असते पण, कोरोना -१९ च्या आदर्श आचारसंहितेमूळे मला लोकांना एकत्र जमवून योग शिकवणे हे शक्य नव्हते.
कोरोना महामारी ते आपल्यापैकी अनेकांना आपापले जिवाभावाचे मित्र गमवावे लागले ,याची खंत मनात होतीच परंतु खंत करत बसण्यापेक्षा आहेत ते हिऱ्या सारखे सोबती मित्र, नातेवाईक कोरोनाचे बळी होऊ नये म्हणून त्यांची रोगप्रतिकारक शक्ती व सकारात्मक विचार वाढवणे जरूरीचे होते. कारण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सतत लॉकडाऊन होत होते.कोरोना पासून बचाव करण्यासाठी घरीच राहण्याशिवाय उत्तम पर्याय नव्हता.
या काळात २४ तास घरात असलेल्या लोकांचा कोरोना पासून बचाव होत असला तरी आरोग्याच्या समस्या उद्भवत होत्या.
लॉकडाऊन मुळे बाहेर पडता येत नव्हते परिणामी हालचाल होत नव्हती. पोटाच्या समस्या बद्धकोष्टता, मलावरोध व पोट साफ न राहणे यासारख्या समस्या सर्वसामान्य झाल्या होत्या. आंतरिक ऊर्जेचा वापर पुरेपूर केला जात नव्हता. खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन न झाल्यामुळे अनेक समस्या उद्भवत होत्या त्यावेळी सहजच हिंदी चित्रपटातले गीत आठवले " जिंदगी हर कदम एक नई जंग है..!
ता.१६ जुलै २०२० ला प्रथम फेसबुक लाईव्ह योगवर्ग सुरू केला तो सतत ता.१९ मार्च २०२१ पर्यंत चालू ठेवला.
पहिल्यांदा ता.२३ मार्च २०२१ ला खरी " गुगल मीट " योगवर्गाची सुरूवात झाली ती धर्माबादचे योग शिक्षक अनिल माकणे यांनी मला त्यांचा योगवर्ग घेण्यास सांगितल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला की आपण हे गुगल मीटवर योगवर्ग घ्यावा. लागलीच मी, डॉक्टर रामभाऊ तायडे सरांशी गुगल मीट संदर्भात चर्चा केली आणि त्यांचा ता. २६ मार्च २०२१ ते ३ एप्रिल २०२१ पर्यंत गुगल मिटवर योगवर्ग घेतला.
त्यानंतर डॉक्टर रामभाऊ तायडे सरांशी चर्चा केली तुमचा योग वर्ग पूर्ण झाला आता काय करायचे त्या वेळेस मनात विचार आला गुगट मीटवर आपण एक संदेश तयार करून माझ्याकडे जेवढे व्हाट्सअॕप ग्रुप आहेत तेवढ्या ग्रुपवर व फेसबुकवर गुगल मीट लाईव्ह योग वर्ग सुरू करण्याची पोस्ट तयार करून ती पोस्ट ता.३१ मार्च २०२१ रोजी अपलोड केली.
त्यानंतर गुगल मीट लाईव्ह योग वर्ग व्हाट्सअप ग्रुप या नावाने ता.१ एप्रिल २०२१ रोजी सुरू केला.तो फक्त ता. ३ एप्रिल २०२१ ते ९ एप्रिल २०२१ पर्यंत जवळपास सात दिवसाचा योगसप्ताहा करीता जवळपास ८० योग साधकांची नावे ग्रुप मध्ये ऍड केले.
प्रत्यक्ष गुगल मीट ॲप लाईव्ह योग वर्ग सुरू झाला ता.३ एप्रिल २०२१ ला ता. ३ एप्रिल २०२२ रोजी वर्षपुर्ती.
कंधार शहरासह नांदेड जिल्हा व महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील गरजवंत योग साधकांना गुगल मीटच्या माध्यमातून योग व प्राणायाम शिकवण्याचे काम येथील योग शिक्षक नीळकंठ मोरे हे मोबाईलच्या माध्यमातून करत आहेत हे कंधार चे नगरसेवक शहाजी नळगे यांना व्हाट्सअप ग्रुप वर समजले व सर्व योग साधक मिळवून लॕपटाॕप देण्यासाठी चंदा संकलन करत असल्याचे समजले. त्यावेळी त्यांनी तात्काळ योगशिक्षक निळकंठ मोरे यांच्या शिवाजीनगर येथील योगसंदेश निवासस्थानी जाऊन समस्या जाणून घेतली व क्षणाचाही विलंब न लावता लॅपटॉप देणार असल्याचे सांगून लागलीच ता. १४ मे २०२१ रोजी अक्षय तृतीयाच्या शुभमुहुर्तावर ५००००/- ( पन्नास हजार ) रूपयाचा लॕपटॉप शहाजी नळगे यांनी भेट दिला.त्यामूळेच हे सर्व साध्य झाले. तेव्हापासून आजपर्यंत नाही तर आजीवन हा वर्ग या लॕपटॉपच्या माध्यमातून आॕनलाईन व आॕफलाईन चालू ठेवणार असल्याचे योगशिक्षक नीळकंठ मोरे यांनी सांगितले.
योग वर्गाच्या वर्षपूर्ती निमित्य योगसाधकांनी दिलेल्या प्रतिकिया खालील प्रमाणे आहेत.
१) सौ . वनिता बिरादार ,उदगीर
आदरणीय सर योगामुळे माझे वजन ७२ किलो वरून ५९ किलो एवढे झाले आहे.
माझी पाठदुखी, कंबरदुखी, किडनी स्टोनची समस्या, डोकेदुखी, मानेचा त्रास, सर्व काही माझ्या शरीरातून निघून गेले आहे. योगासनापूर्वी माझे सर्व शरीर दुखत होते आणि आता सर्व काही स्थिर आहे.
योग हे परिवर्तनाचे एक शक्तिशाली साधन आहे.
_____________
२) सौ. नीता कोल्हे पालघर..
आदरणीय मोरे सर तुमच्या या कार्याला प्रथम सलाम करते , मी पण १० वर्षीपासून योग-प्राणायाम करत आहे परंतु सूक्ष्म व्यायाम कधीही केले नाही. मला हातात साधा चमचा सुध्दा पकडला तर बोटांना खूप मुंग्यां येत होत्या पाठीला आधार न घेता १५ मिनिट पण बसू शकत नव्हते. पण आपल्यासोबत दररोज २ तास ओमकार गुंजन पासून ध्यानधारणा असे सर्व व्यायामामुळे सर्व त्रास बंद झाले आणि आता माझ्या बोटांना मुंग्यां येत नाहीत. आपले खूप खूप आभार..
___________
३) प्रा. लिलाताई आंबटवाड
आदरणीय योग गुरु श्री नीळकंठरावजी मोरे सर मानाची कोटी कोटी जय क्रांती..
आपल्या वर्गास मी ३० मे २०२१ पासून प्रारंभ केला. माझे बंधू सदाशिव आंबटवाड यांनी आपल्या योग वर्गात सहभाग घेतला होता त्याला कोरोना झाल्यानंतर आपल्या योग वर्गास त्याने सहभाग घेतला होता तो योगा करताना पाहून मीही प्रारंभ केला आपल्या योग वर्गा मुळे माझ्या पाय दुखी चा त्रास पूर्णपणे बरा झाला शारीरिक व्याधी बरोबर मानसिक आरोग्य सुधारून मनःशांती संयम सकारात्मक विचारांची वाढ निर्णय क्षमता वाढली त्यामुळे माझ्यावर असलेल्या जबाबदारीचे पद मी सांभाळू शकले म्हणूनच योग वर्गा मुळे मला खऱ्या अर्थाने निरोगी निरामय जीवन लाभले कितीही बिकट परिस्थिती आली तरी किंवा निर्माण झाली तरी त्याला कसं धीरोदात्तपणे तोंड द्यायचे स्वतःला कसं सांभाळायचं हे या योग वर्ग मुळे यामुळे शक्य झाले आपल्या योग वर्गाचा मला झालेला फायदा शब्दबद्ध करणे अशक्य म्हणूनच मानवास जीवन जगण्याचा शाश्वत मार्ग जो दाखवतो तो गुरू म्हणून आपले उपकार शब्दबद्ध करणे अशक्य.
____________
४) सौ. उषाताई कागणे ( सह शिक्षिका , महात्मा फुले प्राथमिक शाळा कंधार)
महिला साठी योग वर्ग वरदान ठरला आहे. आपल्या घराच्या बाहेर पडता येत नव्हते. आता आपण घरात बसून करत आहोत. आदरणीय योगगुरू निळकंठ मोरे सर आपणास सादर प्रणाम आपल्या वर्गाचा सर्वाधिक फायदा महिलांना झाला.चार भिंतीच्या आत बसून त्यांना स्वतःत एवढा बदल करता येतोय याचे सर्व श्रेय योगगुरू तुम्हालाच! माझा गुडघे दुखीचा त्रास बऱ्यापैकी कमी झाला आहे.मनातील नकारात्मक विचार बाजूला सारून जीवन कसे जगावे हे तुमच्या कडून समजलं. ध्यान धारणेतून मन एकाग्र कसं करावं , यांचंही श्रेय फक्त तुमच्या योगवर्गालाच! आपणास आपल्या कार्यासाठी सतत उर्जा मिळो ही ईश्र्वर चरणी प्रार्थना.
__________
५) सौ. लता राठोड नांदेड..
आदरणीय श्री नीळकंठ मोरे सर सप्रेम नमस्कार आपला विनामूल्य योगा कार्यशाळेस एक वर्ष पुर्ण झालेत . आपल्या या निःस्वार्थ व अमूल्य वेळ असा आपल्या योग परिवारास देऊन सर्वासाठी स्वतः चंदनासारखे झिजून इतरांना शारीरिक व मानसिक नवे चेतन्य निर्माण केलंय त्यातून आमच्या शरीरातील अनेक व्याधी नष्ट होऊन बदल घडत गेले . आपल्या योगा क्लास मुळे माझ्या माने तील त्रास पुर्णपणे कमी झाला असुन माझ्या मानेचा बेल्ट पुर्णपणे सुटले आहे .
मानेतील गॅप मुळे मला चक्कर पण येत होती पण या नियमित योगामुळे माझी तब्येत ठीक झाली आहे . आज माझे शरीर निरोगी आणि आनंदीं आहे त्याबद्दल योगगुरूचे शतश : आभारी आहे.
____________
६) प्रकाश जोशी जळगाव..
आदरणीय योगगुरू श्री मोरे सरांना सादर प्रणाम आपल्या योगाला प्रथम वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या योग क्लास चा मला चांगला फायदा झाला. माझी सर्दी कमी झाली. अलर्जी या त्रास कमी झाला. आपण जीव तोडून योगाचे महत्व सांगतात . परंतु काही कारणास्तव योग वर्गाला हजर नसलो तर आपण आठवण काढून विचारपूस करतात . या जगात कोणीही कोणाची काळजी करत नाही . परंतु आपण आम्हाला उभारी देतात . योगा ला हजर राहण्यास सांगतात . व आमच्या कडून योगा करून घेतात.ऐवढी काळजी ह्या जगात कोणीही घेत नाही सर. तुम्ही आमचे मार्गदर्शक व योग गुरु आहात. सर्व रोगाचे औषध योगा मध्ये आहे .
हे आमच्या मनावर बिंबवले व त्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हास आला. आम्ही आपणास कधीच विसरु शकत नाही .योगा केल्या नंतर दिवस भर शरीरात एक प्रकारचे चैतन्य, उत्साह राहतो.
आपले शतशः आभार .
_____________
७) गजानन दादरेकर मुलुंड वेस्ट मुंबई.
आदरणीय श्री.निळकंठ मोरे, साहेबांना सप्रेम नमस्कार, आपल्या या विनामूल्य योगा कार्यशाळेस एक वर्षे पूर्ण झालेत. आपल्या या अथक योग प्रेरणेमुळे आमच्या शरीरात नवे चैतन्य व स्फुर्ती निर्माण झाली, त्यातुन आमच्या शरीरातील अनेक पुर्वीच्या व्याध्या नष्ट होवून बदल घडत गेले. तसेच आम्हाला योग साधनेकरिता सकाळी पहाटे उठण्याची सवय होवून शरीरातील आळस संपुष्टात आला, माझ्या प्रकृतीमध्ये अमुलाग्रह बदल होवून पुर्वीच्या व्याध्यांवर मला मात करता आली आणि नवीन जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली. कधी कधी काही तांत्रिक अडचणीमुळे योगवर्गाला उपस्थित राहता आले नाही, माझ्या योगामुळे आमच्या घरातील सदस्यांना योग साधनेची गोडी निर्माण झाली. त्याबद्दल आपले योगगुरूना भावी आयुष्य सुखसमृध्दी, भरभराटीचे लाभो ही प्रभुचरणी प्रार्थना लाख ,धन्यवाद..
२) स
८) डॉ.अजय कदम मुख्यकार्यकारी अधिकारी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नांदेड..
आदरणिय योगगुरू श्री मोरे सरांना साष्टांग दडंवत आज योगवर्गाच्या वर्धापणदिनानिमित्य सर्व योग साधकांना हरि ओम !
मी,माझी पत्नी व कुटुंबातील अनेक सदस्य दिनांक ३/४/२०२१ पासुन सातत्याने आपल्या मार्गदर्शनानुसार योगाभ्यास करत आहोत.योगा/प्राणायाम केल्यामुळे माझे वजन ६ कि.ग्रा. कमी झाले असुन मला अत्यंत तणावपूर्ण काम असताना सुद्धा या काळामध्ये माणसिक व शारीरिक थकवा कधिही जाणवला नाही तसेच याकाळामध्ये मला दवाखान्यामध्ये जाण्याची कधिच गरज पडलेली नाही. माझ्या पत्नीस कमरेचा त्रास होता तो सुद्धा कमी झालेला आहे.त्यामुळे आयुष्यामध्ये यापेक्षा मोठ यश कोणतही असु शकत नाही.या सर्व यशाच श्रेय केवळ आदरणिय योगगुरु मोरे सरांना जात.योगाकेल्यामुळे दिवसभर प्रसन्न वाटते. सर योगाभ्यास करत असताना आपण अत्यंत मौल्यवान मार्गदर्शन करत असता त्यामुळे दैनिक खानपाण व दिनचर्येमध्ये अमुलाग्र बदल होऊन अनेक चांगल्या गोष्टीची सवय झाली . आदरणिय सरांमुळे जिवनशैलीच बदलुन गेली असे म्हणने अतिशयोक्ती होणार नाही.आदरणिय सर आपण स्वतः अत्यंत अडचणीत असतानाही आपल्या अडचणी बाजुला ठेवुन निस्वार्थपणे ईतरांच्या आरोग्याची काळजी घेत आहात त्याबद्दल आपणास पुनःश्च साष्टांग दडंवत /सलाम.
___________
९) विजय भोगेकर चंद्रपूर.
३ एप्रिल २०२१ ते ३ एप्रिल २०२२. पासूनचा माझा अनुभव
स्थूल शरीर लवचिक झाले .
मांडी घालून बसणे सोपे झाले .
सकाळी उठण्याची वेळ निश्चित झाली .
माझ्या पत्नीच्या पाठीतील दुखणे नष्ट झाले .
हृदय विकार होणार नाही असा आत्म विश्वास आला .
साखर बंद झाली . डायबेटिस नियंत्रनात आली .पोटाचा घेर कमी झाला .इतका सगळा परिणाम .
एका योगासने केला.
______________
१०) लक्ष्मणराव नलाबले..