नांदेड ; प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी वर्धापन दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या सेवा सप्ताहातील लसीकरण शिबिराचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस विजय गंभीरे जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील धने गावकर जिल्हा उपाध्यक्ष अनिलसिंह हजारी मंडळ अध्यक्ष आशिष नेरळकर, सोशल मीडिया सहसंयोजक अक्षय अमिलकंठवार यांची प्रमुख उपस्थिती होती. दिलीप ठाकूर यांनी प्रास्ताविक करताना असे सांगितले की आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरातील नागरिक निरोगी असावे यासाठी पाचव्यांदा लसीकरण शिबिर घेण्यात येत आहे. प्रवीण साले यांनी मार्गदर्शन करताना वेगवेगळे सामाजिक उपक्रम दिलीप ठाकूर रे सातत्याने राबवित असल्यामुळे भाजपची जनमानसातील प्रतिमा आणखी वृद्धिंगत होत असल्याचे प्रतिपादन केले.
लायन्स क्लब नांदेड सेंट्रल सचिव अरुणकुमार काबरा, कोषाध्यक्ष सुरेश निलावार, सहसचिव सुरेश शर्मा, भाजपा सक्रिय सदस्य कामाजी सरोदे ,प्रोजेक्ट चेअरमन संतोष देशपांडे, बिरबल यादव,राजेशसिंह ठाकूर, संतोष भारती, कपिल यादव यांनी बारा वर्षावरील मुलांना शिबिरात आणले. कोरोना लसीकरण न केलेल्या महिला, नागरिक, युवक,गर्भवती माता, अपंग व्यक्ती, बूस्टर डोस साठी पात्र असणारे ज्येष्ठ नागरिक यांचा सर्वे करून आधारकार्ड द्वारे नोंदणी केली. पूर्वी लोकांमध्ये जे लस घेण्याबाबत भीती होती ती भीती यावेळी दिसली नाही. काहीजणांनी कोव्हासीनचा पहिला डोस तर काहीजणांनी कोविशिल्ड चा दुसरा डोस घेतला.
अनेक ज्येष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस घेतले. महापालिकेतर्फे हिवताप अधिकारी
गजानन कंकाळ, प्रभाग कार्यालय अधीक्षक शेख फिरोज, राजश्री कानगुले, अफसाना बेगम, शिपाई इंगोले यांनी चोख व्यवस्था केली होती.ज्येष्ठ नागरिक नरसिंगराव कहाळेकर, गोपालसिंह ठाकुर, दीपकसिंह ठाकुर, माजी नगरसेविका जयश्री ठाकूर यांच्या हस्ते मास्क, सॅनिटायझर, पाण्याची बॉटल व बिस्किट वाटप करण्यात आले. याशिवाय श्री गुरुगोविंदसिंगजी शासकीय रुग्णालय लसीकरण केंद्रात दिलीप ठाकूर यांच्यातर्फे एकही दिवस खंड न पडता सलग ३८८ दिवसापर्यंत मास्क, सॅनिटायझर, पाण्याची बॉटल व बिस्किट वाटप करण्याची सेवा सुरू आहे.
लसीकरण शिबिर यशस्वी करण्यासाठी संतोष भारती,राहुल बनसोडे, शक्ती साखरे, नरसिंग द्रोपदीवार, गजानन मारावार, कपिल यादव, बालाजी नगारे, नथूलाल यादव यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. लहान मुलांसाठी नांदेड शहरात लसीकरण शिबिर आयोजित केल्याबद्दल तसेच सर्वांना मास्क, सॅनिटायझर पाण्याची बॉटल व बिस्किट वाटप केल्याबद्दल संयोजकाचे अनेकांनी कौतुक केले.