सहशिक्षिका पंचफुला वाघमारे महिला शक्ती गौरव पुरस्काराने सन्मानित

नांदेड – येथील अखिल भारतीय जिवा सेनेच्या वतीने सहशिक्षिका पंचफुला शामराव वाघमारे यांना महिला शक्ती गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रा‌.डॉ. लेनीना एसव्हीबी, डॉ. करुणा जमदाडे, अशोक कुबडे, प्रज्ञाधर ढवळे, पांडूरंग कोकुलवार, लक्ष्मण कोंडावार, प्रा. गंगाधर मनसरकरगेकर, गंगाधर जाकारे, पी. एन. निलमवार, गौतम बहाद्दुरे, रणजित गोणारकर, प्रा‌.डॉ. दत्ता कुंचेलवाड, किर्ती सुस्तरवार आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मण लिंगापुरे यांची उपस्थिती होती.

      म. फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त जीवा सेनेच्या वतीने महिला शक्ती गौरव सोहळ्याचे आयोजन केले होते. हदगाव तालुक्यातील डोरली येथे जि. प. शाळेत पंचफुला वाघमारे या विषयशिक्षिका असून गेल्या काही वर्षांत मसनजोगी, कैकाडी, पारधी तसेच घिसाडी या भटक्या विमुक्त जाती जमातीतील महिलांचे प्रबोधन आणि शाळाबाह्य विद्यार्थी विद्यार्थिनींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले. या कार्याची दखल घेत जीवा सेनेच्या नांदेड शाखेच्या वतीने वाघमारे यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेकांनी पंचफुला यांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *