काय सांगू आज पुन्हा पावसात भिजलो
देवा तुझ्या कारुण्याने जागेवर थिजलो॥धृ॥
काळ्या ढगांनी छत कोंदलेले
विद्युत लत्तेने लखलखीत केले
घन कृष्ण मेघांनी२ भारावून गेलो
देवा तुझ्या कारुण्याने जागेवर थिजलो॥१॥
तव जल धारा येती झरझर
भुई रोमांचित सर्व चराचर
निसर्गाच्या कुशीमध्ये
वेडावून गेलो
देवा तुझ्या कारुण्याने जागेवर थिजलो॥२॥
वृक्ष लतिकांना आनंद झाला
पशू,पक्षी, जनांनी गिल्ला केला
जग दुनियेच्या
बाजाराला मुकलो
देवा तुझ्या कारुण्याने जागेवर
थिजलो॥३॥
– प्रकाश दिनकर सकुंडे,
गुरुजी,
मो. ९८८१०३७४९१