भगवान आमलापुरे
दिनांक ३ मे रोजी अक्षय तृतीया च्या निमित्ताने महात्मा बसवेश्वर नियोजित पुतळ्याशेजारी आयोजित सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार बाबासाहेब पाटील बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा प्रवक्ते तथा पुतळा समिती अध्यक्ष गणेश हाके प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा अश्विनीताई कासनाळे, पुतळा समिती सचिव श्री सांब महाजन , भाजपा नेते दिलीप राव देशमुख , सभापती शिवानंद हेगणे,रिपाई सचिव बाबासाहेब कांबळे शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, जिल्हा परिषद सदस्य माधव जाधव महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्ती कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत मद्दे,
काँग्रेस तालुकाध्यक्ष हेमंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, विरशैव सभेचे प्रांताध्यक्ष शिवराज शेटकार, महेश बँकेचे संचालक डि के जाधव, प्रकाश ससाने, चंद्रशेखर भालेराव, राजेश्वर पाटील, शिवदास शेबाळे, नगर परिषद सदस्य लक्ष्मीकांत कासनाळे, अभय मिरकले, रवी महाजन, संदीप चौधरी, राहुल शिवपुजे, अमित रेड्डी,ओम प्रकाश पुणे वसंत शेटकार, शरण चवंडा, शिवकुमार उटगे माधव पुणे, ॲड सांब शेटकार, सिद्धार्थ सूर्यवंशी ॲड किशोर कोरे,ॲड निखिल कासनाळे, सह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुतळा समितीचे अध्यक्ष गणेश दादा हाके यांनी येत्या एक वर्षाच्या आत पुतळा उभारणार असल्याचे सांगून पुढची जयंती नगर परिषदेच्या प्रागंणामध्ये करण्यात येणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती संयोजन समितीचे अभिजीत पुणे , अमोल ततांपुरे, वैभव बंलोरे, प्रफुल्ल कल्याणी,संगम मालुसरे,संतोष निटुरे वैभव बोडंगे, राहुल महाजन सर्व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले
यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यासाठी 18 लाख रुपयांची भरीव मदत यावेळी घोषित केले.
प्रारंभी महात्मा बसवेश्वर चौकात आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले…
यावेळी उपस्थित विनोद हिंगणे अमोल हमने पांडुरंग मिरकले रवी रफळे संतोष रोडगे विकास महाजन इतर उपस्थित होते.