कंधार
खासदार चषक कंधार चे उद्घाटन नांदेड लोकसभेचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर लातूर लोकसभेचे खासदार संगारे यांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळा मध्ये आज कंधार येथे संपन्न झाले
मराठवाड्यात प्रथमच कंधार येथे दिवस-रात्र प्रकाश झोतात सामन्याचे आयोजन खासदार प्रताप पाटील चिखलीकर व लातूर लोकसभेचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या नावे जिल्हापरिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते, या उद्घाटन सोहळ्यास खासदार प्रताप पाटील चिखलीकर व खासदार सुधाकर संगारे यांची प्रमुख उपस्थिती होती यांच्या हस्ते क्रिडांगणाचे पूजन करून या क्रीडा स्पर्धेची सुरुवात करण्यात आली
या उद्घाटन प्रसंगी बोलताना खासदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की मराठवाड्यामधील सर्वात मोठे व सर्व सोयीयुक्त क्रीडा संकुल कंधार येथे बनवण्यासाठी मी कटिबद्ध आहे जने करून ग्रामीण भागातील खेळाडूंना वाव मिळेल व आपले क्रीडा कौशल देशभर दाखवता येईल, या साठी यासंदर्भात केंद्राकडे पाठपुरावा करून लवकरच क्रीडासंकुलासाठी निधी उपलब्ध करून देऊन तालुक्यातील खेळाडूंसाठी हे भव्य क्रीडांगण उभारले जाईल असे ते यावेळी म्हणाले तसेच लातूर लोकसभेचे खासदार सुधाकर शिंगारे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की कंधार सारख्या ग्रामीण भागामध्ये उपजत खेळाडूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे या खेळाडूंना राज्यस्तरावर संधी प्राप्त करून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील
पहिल्या दिवशी चा सामना हा रॉक स्टार क्रिकेट क्लब फुलवळ व तांडव क्रिकेट क्लब चिखली यांच्या झाला या सामन्यांमध्ये तांडव क्रिकेट क्लब चिखली हा संघ विजेता ठरला आजच्या दिवशी चा दुसरा सामना आर आर 11 अकोला व नुरी क्रिकेट टीम नायगाव यांच्यात झाला तर नुरी क्रिकेट टीम नायगाव हा विजय संघ ठरला यानंतर चा तिसरा सामना दोन्ही विजेचा संघामध्ये लढला गेला त्यामध्ये त्यामध्ये नुरी क्रिकेट संघ नायगाव हा विजेता ठरला या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी आयोजन समितीचे भाजपा शहराध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार,युवमोर्च्या जिल्हाउपाध्यक्ष निलेश मनोजसिंह गौर,
समीर चाऊस,साईनाथ कोळगिरे,आसिफ शेख, रमण आवाळे ,सय्यद मुजाहिद ,जमीर लाला, सय्यद नदीम ,शेख अफरोज ,समीर खादिम ,अड सागर डोंगरजकर ,प्रवीण बनसोडे, रवी संगेवार, रामदास बाबळे, सुमित गोरे ,शंतनू कैलासे, आदींनी परिश्रम घेतले या सामन्यांमध्ये पंच म्हणून भरत चव्हाण ,मोइन सर ,यांनी चोख भूमिका बजावली तर समालोचक सलीम खान यांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली पाण्यासाठी कंधार पंचक्रोशीतील क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते