धर्मापुरी महाविद्यालयात बहुविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

परळी /प्रतिनिधी ( प्रा. भगवान आमलापूरे )

धर्मापुरी येथील कै. शंकरराव गुट्टे ग्रामीण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील आंतरिक गुणवत्ता आश्वासन प्रकोस्ठ ,अर्थशास्त्र व वाणिज्य विभागाच्यावतीने बहुविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेत मंगळवारी (दि १७ )ऑनलाईन संपन्न झाली.

            या परिषदेस  सॅलीसबरी  विद्यापीठ अमेरिकाचे  डॉ .प्रवीण  सप्तर्षी , फेडरल विद्यापीठ नायजिरिया ( आफ्रिका ) चे  बाबा लोला .सॅम्यूल, कोल सिटी विद्यापीठ नायनिरिया (आफ्रिका ) चे मायकेल  या व्याख्यात्याचे  यांचे यावेळी मार्गदर्शन झाले. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. इंद्रजीत भगत,अंबाजोगाई, डॉ. संदीप वंजारी,गेवराई, डॉ बालासाहेब मैद, ढोकी हे विविध सत्राच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. या परिषदेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . होळंबे यांच्या हस्ते करण्यात आले . या परिषदेचा अध्यक्षीय समारोप मुंबई विद्यापीठाचे  डॉ.सुरेश मैंद   यांच्या व्याख्यानांनी झाला. या परिषदेस संस्था अध्यक्ष डॉ. शिवाजीराव गुट्टे यांनी शुभेच्छा दिल्या. या परिषदेचे   सूत्रसंचालन  प्रा. डॉ. मामडगे यांनी  तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. एस वाय शिंदे यांनी केले. या परिषदेचे संयोजक प्रा.अविनाश मुंडे, प्रा डॉ सौ. एस डी मुंडे व प्रा. एस टी कावळे यांनी परिषद यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *