हिरवं पान

       मला पहाटे लवकरच उठायची सवय . नेहमीप्रमाणे लवकर उठलो . शेताकडे जायचे होतं . दिवस कासराभर वर आलेलं . हिवाळ्याचे दिवस होते . माझ्या घरापासून सतरा आठरा कि मी अंतरावर माझं शेत . मला दुचाकी , सायकल काहीही चालवता येत नाही .

विष्णुपूरी -सिडको – किवळा -बोरगाव ओलांडून  मला शेताला जावावे लागते . मी रिक्सा मिळत नाही म्हणून गरबड करत होतो . बायकोच्या नावाने गोंदरत ही होतो . गडबडीनं जेवन केलो .सोबत पिण्याचं पाणी घेवून लगबगीनं शेताकड निघालो . ठिक दहा वाजता बोरगावचं रिक्शा निघालं होतं . कसंबस रिक्सात बसायलां मिळालं .

रिक्शात पाठीमागे चार व चालकाच्या दोन्ही बाजूला दोन दोन प्रवासी बसवून रिक्शावाला निघालं . रिक्सा कुतत कन्हत सडक तुडवत पळू लागलं . अंदाजे साडेदहा वाजता बोरगावला नेवून रिक्सवाल्यानं सोडलं . भाडयाचे रुपये विस देवून मी शेताकडे निघालो . 

          हातात थैली त्यात दोन तीन पाण्यानी भरलेल्या बाटल्या घेवून मी झपाझप पावले टाकत शेताकडे निघालो . कच्चा रस्ता . कच्च्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट खुरटीझाडं . त्या झुडपांत काही आवचीन लपून बसलेलं दिसत नव्हतं . त्या भागात जंगली डूकरांचा फारच सुळसुळाट .

शेतातलं उभ पिकाची नासाडी करत होते . जाळीतून उठून अंगावर कधी येतील याची शाश्वती मला नव्हती . मी भीतभीत रस्ता पार करत होतो . हातात एक तुटकं लाकूड घेवून मनातील भीती कमी करत होतो . एखादा पक्षी उडालं तरी दचकत होतो . माझ्या सोबत कोणीही नव्हतं . एकटाच भीतीने भरलेल्या मनाने चालत होतो .   

hirwe pan

            .पंधरा विस मिनीटं चालल्या नंतर शेतात पोहचलो . कापूस वेचनी चालू होती . शेतात शेजारच्या गावातील पाच सहा बायका कापूस वेचत होत्या .मी शेतात एक चक्कर मारली . चक्कर मारताना एक कापूस वेचणारी आजी म्हणाली , ” आलास का बापू .एकटाच आलास . तूझी मालकीन आणली नाही वाटत सोबत. का आणला नाहीस बापू तिला ?” बोलता बोलता ती कापूस वेचण्याचं थांबवलं नव्हतं .

मी म्हणालो ,” माय तिला मी उद्या घेवून येतो की .” आजी म्हणाली , ” नाहीरं बापू बाई आल्या असत्या तर तूरीच्या  सेंगा तोडून नेल्या असत्या की .” मी म्हणालो, .”माय, उद्या दोघंही जोडीनं येताव व सेंगा घेवून जाताव की ” बर बापू , तूला ऊनबीन लागल सावलीत बस जा.” आजी म्हणाली आजी प्रेमळ दिसत होती . खरं तर उन्ह नव्हतंच पण ती उगीच काळजी घेत होती . विणाकरण मला शहरी नाजूक समजत होती. मी तीला नाराज केलो नाही .मी हो म्हणून शेतातून बाहेर आलो . माझ्या शेताच्या शेजारीच बोरीचं भलं मोठं झाड . त्या झाडला मरणाची बोरं लागलेली होती . काही पिकलेली, काही गाबोळी तर काही हिरवीकचं होती . 

           झाडाखाली पिकलेल्या बोराचं खच पडलेला होता . माझ्या जवळच्या थैलीत मी बोरं वेचून जमा केलो .थैलीत बोरं गच्च भरूण घेतलो . मन भरोस्तर बोरं खाल्लो . झाडाखाली बसून बोरं वेचत होतो . वाऱ्याच्या झुळक्याबरोबर बोरं खाली पडत होती .माझा शेजारी बालाजी मरवाळे खूपच सज्जन माणूस . तोचं माझी ही शेती कसतो .

बोरीच्या झाडाखाली त्याने जागा साफ करून दिली .थोडा वेळ आम्ही दोघजण गप्पा मारत बसलो कापूस छान आलयं पण वेचणीला माणसं बाया भेरत नाही . शेतात काम करायला कोणीही तयार नाहीत कसं होईल . मी म्हणालो , ” दादा काम व्हईलच की एकदोन तरी काम करणारं मिळतील ” मरवाळे दादा होय म्हणून नंतर ते उठून काम करण्यास निघून गेले .

मी एकटाच आरामशिर बोरीच्या झाडाखाली बसलो होतो . कधी शेताजवळील डोंगराकडे पहात होतो तर कधी कापूस वेचणाऱ्या बायाकडे . कापूस वेचता वेचता बायाचं हासणं बोलणं चाललं होतं . कोणी नंदन तर कोणी भावजय नात्यानं हासत होत्या . एकमेकीच्या टिंगल टवाळी चालली होती . तोंडाची वटवट व हाताची झटपट चालू होती . 

         आता मी शांतपणे माझ्या आवडीचे हिंदी सिनेमातील गाणे ऐकत विसावलो होतो . पोटाचं खबदाड भरण्यासाठी बायाची कापूस वेचण्याची घाई चालू होती . जेवढं कापूस जास्त वेचतील तेवढी मजूरी ज्यास्त मिळणार होती . वजणावर कापूस वेचत होत्या . त्यांच्या कामाकडे पाहूण मला माझे बालपणीचे दिवस आठवले . माझी याडी , मी .माझे दादा ,वाहिनी असंच कोणाच्या तरी शेतात मजूरीला जात होतो . पोटाचं खळगं भरण्यासाठी काम करायचो . राबराब राबायचो .

तांड्यात काम मिळतच नसे . तांड्यापासून गाव पाचसहा किमी दूर तेथंपर्यत काम करणासाठी भटकायचो .या माझ्या भूतकालीन विचारात मग्न असतानाच माझ्या समोर कोवळं, कच्च बोरीचं पान झाडावरून खाली पडलं !   

त्या पानाकडे पाहून माझ्या टाळक्यात विचारचक्र सुरु झाले .

लोक म्हणतात , “आरं हे पिकलेलं पान हाय आज ना उद्या गळणारचं हाय की “

पण माझ्या समोर

चक्क

हिरवं

पान

पडलं होतं .

लोक काहीही म्हणो पण जीवन हे क्षणभंगुर आहे . जीवन हे पाण्यावरचा बुडबूडा आहे . ते कधी फूटेल याचा नेम नाही . असे विचार माझ्या मनात घोळू लागले .म्हणून उगीच पिवळ्या पानाकडं पाहू नका . पिवळ्या पानांना हिनवू नका . नक्कीच पिवळ पिकलेलं पान लवकर गाळेल पण हिरव्या पानचं काय ?   

         आज कोरोना नावचं भयान अक्राळ विक्राळ राक्षस जगात , आपल्या देशात व राज्यात थैमान घालतोय . हा राक्षस बहुरंगी आहे . हा बहुढंगी आहे . तो राक्षस असल्या मुळे त्याला विविधि रुपे धारण करता येतात . तो कोणत्या रुपात आपल्यावर हल्ला करेल याचा नेम नाही . तो कुठे दडून बसलेला आहे हे ही कळत नाही दिसत पण नाही . वेळ ,काळ दिवस ,वार , दिवस रात्र तो पहात नाही . आचनक घाला घालण्यासाठी तो दबा धरून बसलेला आहे . त्याचा अक्राळविक्राळ जबडा वासून तो दब्या पावलाने आक्रमण करत आहे . करणार आहे.     

   म्हणून मी सांगतोय बाबानो तुम्ही हिरवी पानं आहात . तुमच्यात जोम आहे . शक्ती ,बळ ,उत्साह आहे . सळसळतं रक्त आहे . मला काहीच होत नाही मी भलताच तगडा आहे . माझ्यात त्या रोगाला तोंड देण्याची शक्ती आहे या भ्रमात राहू नका . विनाकारण वेड्या पिसाळलेल्या भटक्याकुत्र्या प्रमाणे इकडून तिकडे भटकू नका .

येथे तुमचं शक्ती,बल कामाला येणार नाही . तर तुमचं समजुतदारपणा , शहाणपणा तुमची सहनशक्ती कामाला येणार आहे . त्यामुळे घरातील पिवळीपानं चार दिवस सुखाचे घास खाऊन तुमच्या सोबत आनंदाने रहाणार आहेत . पिवळ्याधमक पिकलेल्या पानाची काळजी जरुर घ्या .

पण

हिरवं

पान ही

मधेच गळून पडते हे विसरू नका . स्वतःची , घरातील प्रत्येकांची काळजी घ्या . घरात बसूनचं कोरोना राक्षसाला हारवू या . 

M.R.RATHOD
M.R.RATHOD

     राठोड एम० आर० ( गुरुजी )”गोमती सावली “

काळेश्वरनगरविष्णुपूरी

नांदेड ९९२२६५२४०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *