छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महावीर चौक, बर्की चौक, महाराणा प्रताप चौक सिडको, छावा चौक कौठा येथे भूमिपूजन करण्यात आले. लातूर फाटा (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक) ते ढवळे कॉर्नर व महाराणा प्रताप चौक सिडको ते हडको पाण्याची टाकी, उस्माननगररोड लिंक रस्त्याचे सीसी रस्ते व नाली बांधकाम दुभाजकासह संगमस्थळाची सुधारणा केली जाणार आहे. रवीनगर चौक ते लातूर रोड पोलीस चौकी ते साई कमान ते वसरणी येथे सीसी रस्ते व नाली बांधकाम दुभाजकासह संगम स्थळाची सुधारणा करणे,
रेल्वे स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-मुथा चौक-महावीर चौक-गुरुद्वारा चौक (देनाबॅक चौक)-जुना मोंढा-बर्की चौक-पहेलवान टी हाऊस-देगलूरनाका येथे सीसी रस्ते व नाली बांधकाम दुभाजकासह संगम स्थळाची सुधारणा करणे, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ-महात्मा गांधी पुतळा-फॉरेस्ट ऑफीस चौक-गुरुद्वारा गेट नंबर 1 ते रणजीतसिंह मार्के (स.भगतसिंग चौक)-केळी मार्केट चौक-कब्रस्तानच्या घर बाजूने उर्दू घरापर्यंत सी.सी. रस्ते व नाली बांधकाम दुभाजकासह संगम स्थळाची सुधारणा करणे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक-हिंगोली गेट आरोबी-यात्री निवास पोलीस चौकी-फॉरेस्ट ऑफीस ते महावीर चौक-मल्टीपर्पज हायस्कूल ते बंदाघाट लिंक सीसी रस्ते व नाली बांधकाम दुभाजकासह संगम स्थळाची सुधारणा करणे या कामांचा विकास कामात समावेश करण्यात आलेला आहे. या कामांमुळे नांदेडकरांच्या जनजीवनास व वाहतुकीस मोठा लाभ होतो.