माजी सैनिक संघटनेच्या मागणीला यश.
कंधार प्रतिनिधी
कंधार तहसिल कार्यालयात सध्या मनमानी कारभार चालु असून पैसे द्या आणी काम करुन घ्या असाच प्रकार सध्या चालु असल्याने गोरगरीब नागरीक व विद्यार्थ्यांना अर्थिक झळ सहन करावी लागत आहे.सेतु सुविधान केंद्र चालक हे जनतेची प्रंचड लुट करत असल्या संदर्भात तहसीलदार यांना सेतु सुविधा सेवा केंद्रावर दरफलक लावण्या संदर्भात माजी सैनिक संघटनेच्या वतिने लेखी निवेदन दिले होते.या निवेदनाची दखल घेऊन शासनाच्या नियमा प्रमाणे सेतु सुविधा केंद्रावर दरफलक लावण्याचे आदेश तहसिलदार यांनी सेतु सेवा चालकांना दिले असल्याने माजी सैनिक संघटनेच्या मागणीला यश आले आहे.सेतु सेवा केंद्राच्या दरफलका वर जेवढे पैसे लिहले आहेत तेवढेच पैसे नागरीकांनी द्यावे तसेच जास्तीचे पैसे देवु नये असे अहवान माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुक्कलवाड यांनी केले आहे.
महसुल विभाग हे भ्रष्टाचाराचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाते.सध्या या कार्यालयत कोणत्याही कामाला पैसे घेतल्या शिवाय काम केल्या जात नाही.या संदर्भात सेतु सुविधा केंद्र चालकाणी तर प्रचंड लुट केली जात आहे.
उत्पन्न दाखला 33रु60पैसे,रहिवासी प्रमाणपत्र 33रु60पैसे,जातीचे प्रमाणपत्र 57रु 20पैसे व ईतर कागदपत्रे काढण्यासाठी जवळपास 33रु60पैसे एवढीच फिस आकारण्याचा शासनाने नियमावली घालुन दिली आहे.परंतु हे सेतु सुविधा चालक 100ते 200रुपये आकार असल्याचे निवेदन माजी सैनिक संघटनेच्या वतिने तहसिलदार यांना देण्यात आले होते.या निवेदनात असे नमुद करण्यात आले होते कु.सेतु सुविधा केंद्र चालक हे जनतेची लुट करत आहेत.वाटेल तेवढे पैसे घेऊन आपलाषखिसा गरम करत असल्याने गोरगरीब नागरीकांची अर्थिक लुट केल्या जात आहे.शासनाच्या नियमानुसार सेतु सुविधा केंद्रावर कोणत्या प्रमाणपत्राला किती फिस लागते हे ठळक आक्षारात लिहुन दर फालक लावणे बंधन कारक आसताना कोणत्याच सेतु केंद्रावर दर फलक लावले नाहीत.आर्जेंन्ट प्रमाणापत्र देण्याच्या नावाखाली तर हजारो रुपये घेतले जात आहेत.विशेषा बाब म्हणजे एखादे प्रमाणपत्र दाखल केले असता ते वेळेवर व कालावधीत मिळत नाही परुत पैसे जास्त दिले की एका तासात कसेकाय मिळु शकते अशा प्रश्न ही विचारण्यत आला होता.सर्व सेतु सुविधा केंद्रावर मोठ्या अक्षरात दरफलक लावण्यात यावे व जास्तीचे पैसे घेऊ नये आशी मागणीचे निवेदन देण्यत आले होते.यावर तहसिलदार यांनी तातडीने सेतु सुविधा केंद्रावर दर फलक लावण्याचे पत्र काढण्यात आले आहे.
च