चारधाम करून परतलेल्या ४५ यात्रेकरूंचे नांदेड रेल्वे स्थानका वर रात्री जल्लोषात स्वागत

नांदेड ; प्रतिनिधी

कोरोना प्रतिबंधामुळे दोन वर्षानंतर सुरू झालेल्या चारधाम यात्रेत भक्तांच्या प्रचंड गर्दीमुळे व प्रतिकूल हवामानामुळे अनेकांना दर्शन मिळाले नसताना धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे सर्वांचे चारही ठिकाणचे व्यवस्थित दर्शन झाल्यानंतर सुखरूप परतलेल्या यात्रेकरूंचे नांदेड रेल्वे स्थानका वर रात्री जल्लोषात स्वागत करण्यात आले.

४५ यात्रेकरूंच्या जत्थाने बद्रि,केदार,गंगोत्री, यमुनोत्री ,हरिद्वार ऋषिकेश या स्थळांना पंधरा दिवसात भेट दिली.सुशीलाताई बेटमोगरेकर,जयश्री चव्हाण, संध्या पाटील,वंदना चव्हाण, नंदिनी बेळगे,
कविता चव्हाण, प्रा.सरोज पाटील शेळगावकर, कल्पना पोमदे, सोनिया पाटील, राधाताई पाटील ,कुसुम जांभळे, शीला पवार, चित्रा चव्हाण, मीरा चव्हाण, इंदू बेटमोगरेकर, नंदा कदम, जयश्री पाटील ,लक्ष्मी बस्वदे, विजयमाला चव्हाण, शोभा जाधव,अमोल गोळे यांनी परतीचा प्रवास डेहराडून ते हैदराबाद विमानाने केला. या सर्वांचे नायगाव नगरपंचायत च्या वतीने मध्यरात्री जल्लोषात स्वागत करण्यात आले.
रेल्वेतून परत येणाऱ्या मध्ये नरसिंह ठाकूर व अखिल भारतीय क्षत्रिय महासभा महिला प्रदेशाध्यक्षा सुषमा ठाकूर ,श्रीकांत झाडे ,अनिल जोशी, त्र्यंबक लोंढे, अरविंद चौधरी ,अशोक भोसले, सुरेश जाधव, हेमलता शहाणे, सुंदर बोचकरी,जयश्री झाडे, शीला खाकरे, मीना जोशी, श्रेयस गुर्जर ,सुनंदा लोंढे,अंजली चौधरी, कोंडाबाई भोसले, विजया जाधव
यांचा समावेश होता. परतीच्या प्रवासात अकोला, वाशिम, हिंगोली पूर्णा या स्थानकावर सर्वांचा सत्कार करण्यात आला. ऊना हिमाचल एक्सप्रेस नांदेडला नियोजित वेळा पेक्षा एक तास उशिरा आली तरीदेखील यात्रेकरूंच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने गर्दी जमली होती. भाजपा सक्रिय सदस्य कामाजी सरोदे, रेल पार्सल कामगार


संघाचे अध्यक्ष गोपाळराव मळगे व सचिव मारुती कुमार, लायन्स सहसचिव सुरेश शर्मा, हनुमान पेठ मंडळ उपाध्यक्ष राजेशसिंह ठाकुर, लायन्स डबा स्वयंसेवक प्रभुदास वाडेकर, शेख अक्रम, विजय वाडेकर, सुमित चव्हाण, पूजा व धनराजसिंह ठाकूर, शैलेश शहाणे, प्रीति चौहान,नेहा राजपूत, पुनम चौहान, पूजा चौहान यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. यात्रेकरूंचे पुष्पहार शाल,सिरोपाव, मोत्याची माळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. हर हर महादेव, बम बम भोले, गंगा मैया की जय या घोषणा सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. योग्य नियोजन, प्रवासाची व निवासाची उत्तम व्यवस्था, महाराष्ट्रीयन जेवण, भरपूर मनोरंजनाने ओतप्रोत भरलेल्या या यात्रेत एक कौटुंबिक वातावरण निर्माण झाले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील पंधरा दिवसात एक दुसऱ्यांना सहकार्य करणाऱ्या यात्रेकरूंचे निरोपाच्या वेळी डोळे पाणावले होते. नांदेडकरांच्या शुभेच्छामुळेच यात्रा सुखरूप पार पडली असून अनेकांच्या आग्रहास्तव सप्टेंबर महिन्यात चारो धाम यात्रेची नवीन बॅच काढण्याचे नियोजन सुरू असून पुढील आठवड्यात त्याची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक दिलीप ठाकूर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *