कंधार ; ता.प्र
२०२२-२०२३ शैक्षणिक सत्र १५ जून रोजी पासून सुरू झाले आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शासनाचे पुस्तके वाटप व गुलाब पुष्प देऊन सत्कार कार्यक्रमाचे आयोजन महात्मा फुले प्राथमिक शाळा कंधार येथे करण्यात आले होते .
संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डी.एन केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली सदरील कार्यक्रम संपन्न झाला . या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून हिंदवी बाणा लाईव्ह चे संपादक माधव भालेराव , कंधार पोलीस स्थानकाचे पोलीस मगदूम शेख , गणेश तुतुरवाड , पालक भाऊसाहेब डोळेवार , निवृत्ती कदम आदीसह शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे डी. जी , शिक्षिका सौ उषा कागणे , आनंदा आगलावे , राजू केंद्रे , चंद्रकला तेलंग , घोडजकर आदींची यावेळी उपस्थिती होती .
शाळेतून विद्यार्थी घडतात व देशसेवा , समाजसेवा करतात त्यामुळे त्याच्या पालकांनी जागरूक राहावे असे आवाहन यावेळी संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डी एन केंद्रे यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगांबर वाघमारे यांनी तर आभार आनंदा आगलावे यांनी मांडले .