पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड
जा.क्र. 251 / 2022 दिनांक : 26.06.2022
1 ) घरफोडी :
भोकर :- दिनांक 25.06.2022 रोजी 12.00 वा. से 15.00 वा. चे दरम्यान, फिर्यादीचे राहते घरी प्रफुल्लनगर चिखलवाडी भोकर ता. भोकर जि. नांदेड येथे यातील फिर्यादी ची पत्नी हि घराला कुलूप लावून तिच्या मुलीकडे कार्यक्रमाला गेले असता घराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करुन घरातील सोन्या चादीचे दागिने • नगदी असा एकुण किंमती 3,90,040 / रूपयाचा ऐवज कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेला. वगैरे फिर्यादी शेख महंमद गयासोदिन शेख महंमद अजिजोदिन वय 57 वर्षे, व्यवसाय व्यापार रा प्रफुल्लनगर चिखलवाडी भोकर ता. भोकर जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे भोकर गुरनं 232/ 2022 कलम 454,380 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोउपनि / श्री अनिल कांबळे, मो.क्र. 9096254358 हे करीत आहेत.
2 ) जबरी चोरी :
हिमायतनगर :- दिनांक 25.06.2022 रोजी पहाटे 03.22 वा. चे सुमारास, मौजे पारवा खुर्द शिवारातील रुद्रानी इनफ्रास्टक्चर कॅम्प साताशय हनुमान मंदीर समोर ता. हिमायतनगर जि. नांदेड येथे, यातील फिर्यादी यांना सेक्युरीटी गार्ड नागोराव पवार यांनी फोन करुन चोर आलेत हुशार रहा असे कळविले व त्याचे पाच ते दहा मिनीटांनी फिर्यादीचे रुम बाहेर अज्ञात चार माणसे येवून त्यांनी अचानक दगडफेक सुरु केली ते आत येवु नये म्हणुन फिर्यादी व त्यांचे सोबती असे दोघांनी दरवाजा पक्का घरुन ठेवला परंतु आरोपीतांनी त्यांच्या दरवाजा वर लाथा व कुन्हाडीने मारुन आत घुसले व पैसे दया नाहीतर मारुन टाकु अशी धमकी दिली, त्यापैकी एकाने फिर्यादीच्या डोक्यात जेवणाचे स्टिलचा टिफीनचा डब्वा मारुन जखमी केले व हँगरवर असलेल्या पॅटच्या खिशातुन नगदी 2000/- रुपये व एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल किंमती 5000 /- रुपयेचा व सोबतचे चिंटु भाई यांचे पाकीटातुन नगदी 1500 /- रुपये आणि ओपो रेनोव्हो कंपनीचा मोबाईल किंमती 8000 /- रुपयाचा असा एकुण किंमती 16,500 /- रुपयाचा माल जबरीने चोरुन नेला व इरटिगा गाडीचे काच फोडुन नुकसान केले. वगैरे फिर्यादी दगडु बन्सी ओहळ, वय 40 वर्षे, व्यवसाय खाजगी नौकरी रा. रुद्रानी इनफ्रास्टक्चर कॅम्प साताशय हनुमान मंदीर समोर ता. हिमायतनगर जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे हिमायतनगर गुरनं 156 / 2022 कलम 392,427 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास सपोनि / श्री महाजन, मो.क. 9689707038 हे करीत आहेत.
3) खंडणी :
देगलुर :- दिनांक 21.08.2021 रोजी 14.30 वा. चे सुमारास, जुनी नगर परिषद देगलुर च्या गेट जवळ, देगलुर ता. देगलुर जि. नांदेड येथे, यातील नमुद आरोपीने फिर्यादीस तुमचे स्वच्छतेचे कामे बरोबर नाहीत माहिती अधिकार मध्ये कामाची मागणी न करण्यासाठी व तक्रार न करण्यासाठी 10000/- रुपयाची खंडणी मागतली व 10000/- रुपये खंडणी घेतली, नौकरी घालवण्याची धमकी दिल्याने आज रोजी तक्रार दिली आहे. वगैरे फिर्यादी मारोती हाजेप्पाराव गायकवाड, वय 58 वर्षे, व्यवसाय नौकरी स्वच्छता निरीक्षक न.प. कार्यालय देगलुर रा. नगरेश्वर नगर देगलुर ता. देगलुर जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे देगलुर गुरनं 310 / 2022 कलम 385,506 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोउपनि / श्री मोरे, मो.क्र.
9821159844 हे करीत आहेत.
4) विवाहीतेचा छळ :
5) जुगार :
1 ) भोकर :- दिनांक 25.06.2022 रोजी 15.00 वा. चे सुमारास, मौजे थेरबन येथील शंकर घिसाडी यांचे घराजवळील चिंचेच्या झाडाखाली भोकर, ता. भोकर जि. नांदेड येथे, यातील नमुद सहा आरोपीतांनी विना परवाना बेकायदेशिररित्या झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत व खेळवित असतांना 4700 /- रुपये व जुगाराचे साहित्यासह मिळुन आले. वगैरे फिर्यादी पोह/ 1765 संभाजी विट्ठलराव हनुमंते, ने. पोस्टे भोकर यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे भोकर गुरनं 231 / 2022 कलम 12 (अ). म. जु. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोह/ 1853 देवकांबळे, मो. क्र. 02467-222623 हे करीत आहेत.