कंधार ; दिगांबर वाघमारे
कोरोना महामारी मुळे शाळा, क्लासेस बंद असल्यामुळे पालक विद्यार्थी शिक्षक चिंतित होते. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होऊ नये असे सर्वांना वाटत होते. ऑन लाइन क्लासेस सुरू झाले. त्यात अनेक अडचणी होत्या. या सर्व अडचणींवर मात करत परफेक्ट इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठले.
नुकताच जाहीर झालेल्या नवोदय विद्यालय परीक्षेचा निकालांमध्ये पेठवडज येथील परफेक्ट इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. सायली बालाजी तेलवाड, सोहम उमाकांत जाधव, अरविंद पांडुरंग मेकवाड, ओमकार शिवलिंग स्वामी,नंदनी तुळशीराम कांबळे या पाच ( 5) विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.मागिल वर्षी स्कालरशिप परीक्षा
पाचवी मध्ये 33 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यात 32 पात्र झाले यामध्ये शिष्यवृत्ती धारक गुणवत्ता यादीत 19 विद्यार्थी आले, तसेच आठव्या वर्गाच्या 30 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी 11 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आहेत या वर्षी पाचवीचे 19 व आठवीचे 11एकूण 30 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आहेत.
आतापर्यंत शिष्यवृत्ती धारक गुणवत्ता यादीत 112 + कोरणा काळातील30=142 विद्यार्थी झळकले आहेत तसेच
आतापर्यंत नवोदय विद्यालयासाठी 50+कोरणा काळातील 8वी चे 4विद्यार्थी 5 वी चे 4 विद्यार्थी एकुण नवोदय विद्यालयासाठी 58+5=63विद्यार्थी व सातारा सैनिक स्कूल व चंद्रपूर सैनिक स्कूल साठी 21 पात्र झाले आहेत यावर्षी ही *पाचवीच्या वर्गातील तालुक्यात 27शिष्यवृत्ती धारक झाले आहेत त्या पैकी परफेक्ट इंग्लीश स्कूल चे 19 विद्यार्थी तर आठवी वर्गातील तालुक्यात 18विद्यार्थी त्या पैकी 11 विद्यार्थी परफेक्ट इंग्लीश स्कूलचेच.