शेती व्यवसाय करताना होणाऱ्या विविध अपघातामुळे शेतकऱ्यास मृत्यू ओढवल्यास किंवा अपंगत्व आल्यास सध्या संबंधित अपघातग्रस्त शेतकऱ्या विमाछत्र ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमार्फत प्रदान करण्यात आले असून त्याचा लाभ त्या शेतकऱ्यास व त्याच्या कुटुंबास देण्यात येतो आहे. राज्यातील खातेदार शेतकरी यांचा विमा उतरण्याची रक्कम राज्य शासन विमा कंपनीस प्रतिवर्षी भरणा करत असते.
पूर्वी या योजनेचा लाभ फक्त वहितीधारक खातेदार शेतकरी यांनाच मिळत असे. परंतु दिनांक ३१ ऑगस्ट २०१९ च्या सुधारित शासन परिपत्रकानुसार राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणताही एक सदस्य आई, वडील, शेतकऱ्याची पती-पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणत्याही एका व्यक्तीस असे १० ते ७५ वयोगटातील एकूण २ जणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्या संदर्भात शासन निर्णय आहे .
सदरच्या योजनेनुसार आर्थिक वर्ष माहे ७ एप्रिल २०२१ ते ६ एप्रिल २०२२ ह्या एक वर्षाच्या कालावधीत ह्या कार्यालयात एकूण ५२ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यातील ३ प्रस्ताव नियमबाह्य असल्यामुळे अपात्र ठरले. तर ४९ प्रस्ताव पुढील कार्यवाहीस्तव विमा कंपनीकडे पाठवण्यात आले होते. त्यापैकी १४ प्रस्ताव मंजूर झाले असून या १४ अपघातग्रस्त कुटुंबाला २८ लक्ष पयांचा आर्थिक आधार मिळाला झाले .
यामध्ये १) भेंडेवाडी (प्रवासात अपघात), २) चिंचोली (वाहन अपघातात), ३) मानसपुरी मोटरसायकल अपघात ), ४) लाठ बुर्द ( मळणी यंत्र अंगावर पडून ), ५) नारनाळी (पाण्यात बुडून), ६) गुट्टेवाडी (वाहन अपघात), ७) वहाद (विहिरीत पाय घसरून मृत्यू), ८) पानशेवडी (वीज कोसळून महिला शेतकरी), ९) गोणार (सर्पदंश), १०) पानभोसी (विजेचा धक्का लागून), ११) चिखली (पाण्यात बुडून), १२) कळका (महिला शेतकरी रस्ता अपघात), १३) पोखर्णी (दुचाकी अपघात), १४) हाडोळी ब्रह्मशेठ (वाहन अपघात) इत्यादी गावांचा समावेश आहे.
आणि ४ प्रस्ताव मंजुरीच्या स्तरावर असून बाकी प्रस्ताव विमा कंपनीकडे पुढील कार्यवाहीस्तव प्रगतीपथावर असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षिका सौ.एस.एस. पिंपळगावे यांनी दिली.