जागतिकीकरण हे खाजगीकरणाचे वैश्वीक रूप आहे.खाजगीकरणाला बाजारीकरणाचे अभद्र स्वरूप सर्वोच्य न्यायालयाच्या निकालाचा नकळत हातभारच लागलेला दिसतो.अस मत डॉ.जनार्दन वाघमारे सर नोंदवतात.त्याच उदाहरण म्हणजे “टी.एम.ए.पै वि.कर्नाटक राज्य या प्रकरणात सर्वोच्य न्यायालयाने अशी भूमिका घेतली की “ज्या खाजगी संस्था विशेषत:अल्प संख्यांक संस्था शासनाकडून अनुदान किंवा अन्य स्वरूपाची मदत घेत नाहीत ,त्यांच्यावर शासन कुठलेच बंधन वा नियंत्रण आणू शकत नाही.आणता कामा नये.प्रवेश परीक्षा घेण्याचा , प्रवेशाचे नियम ठरविण्याचा ,फी आकारण्याचा त्यांना अधिकार असेल.एवढचं की यातून त्यांना त्या तून नफा मिळवता येनार नाही. या निवाड्या मुळे झाले असे की ,डी एड बी एड फार्मसी ,होमिओपथी वैद्यकिय महाविद्यालयांना फी वाढवण्या साठी रान मोकळे झाले.एवढच नाही तर त्यांनी शासनाशी संघर्ष करण्याची तयारी देखील केली. भारतीय राज्य घटना सामाजिक न्याया ला महत्व देते.जागतिकीकरण हे सामाजिक न्यायाला आपल्या जवळ सहसा फटकू देत नाही.मग अश्या अवस्थेत बहूजनांच्या भवित्व्य काय ?जागतिकीकरण हे भांडवल शाही ला पोषक आहे. केंद्र सरकारने नवीन शै.धोरण २०२० आणले आहे.त्यावर साधक बाधक चर्चा सुरू आहे.काही सकारत्मक आहेत तर काही नकारात्मक विचार व्यक्त करीत आहेत. शै.पुनरचना करतांना भारतीय राज्य घटना समोर ठेवून केली पाहीजे.आपल्या राज्य घटनेमध्ये सामाजिक पुनर्घटनेची मुलभूत तत्वे ग्रंथीत केली आहे.ती तत्वे समोर ठेवून समाजाची पूनरचना आपण का करू नये?भवितव्याचा वेध घेणारी शिक्षण पद्धती आपण निर्माण केली पाहीजे..राज्य घटनेवर आघात होणार नाहीत ,इतिहासाची मोडतोड होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहीजे. निव्वळ गुणवत्तेचा आग्रह धरणारांनी सामाजिक न्यायाला विरोध केलेला आहे.स्वातंत्रोकाळात सामाजिक न्यायाची संकल्पना ही आमच्या विकास नीतीची आधारशीला बनली.शिक्षणात आरक्षण आले..ते त्याच्या साठीचं.आरक्षण हे सार्वजनिक क्षेत्रालाच लागू आहे.खाजगी क्षेत्राला लागू नाही.त्या मुळे आरक्षणाच्या तरतुदींना छेद मिळाला.खाजगी शिक्षण संस्थांनी विशेषत:वैद्यकिय व अभियांत्रकी महाविद्यालयांनी गूणवत्ते पेक्षा पैश्याला अधीक महत्व दिले.त्या मुळे सामाजिक न्यायाचा त्यांनी बळीचं घेतला.त्या मुळे आरक्षण हे खाजगी क्षेत्रात सुद्धा लागू झाले पाहीजे.वंचितांना पुढे आणायचे असेल तर “विशेष संधी” व सुविधा त्यांना द्याव्याच लागतील. – अ.फ.भालेराव,(साहित्यिक) मुक्ताईनगर जि. जळगाव संदर्भ:- बदलते शिक्षण : स्वरूप आणि समस्या :-डॉ.जनार्दन वाघमारे सर |