कंधार प्रतिनिधी
कंधार लोहा कर्तव्य दक्ष तहशिलदार व्यंकटेश मुंडे यांनी कंधार लोहा तालुक्यातील चार दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे झालेले अतोनात नुकसान व पुरामुळे अनेक गावाचा तुटलेला संपर्क याची
स्वता महसूल विभागाची टिम घेऊन भरपावसात छत्री लावुन पाहणी करण्यासाठी बेट सांगवी, सोनखेड, आनेक गावामध्ये जाऊन परिस्थिती चा आढावा घेत आहेत तसेच शेत शिवाराची पाहणी करत आहेत. सोबत तलाठी पाईकराव व तलाठी मारोती कदम होते.
तसेच लोहा तालुक्यातील नदीच्या पुरामुळे अनेक गावाचा संपर्क तुटलेला आहे अशा गावांची पाहणी केली यामध्ये लोहा तालुक्यातील शेलगाव, धानोरा, जवळा दे. धनज या या गावाचा संपर्क तुटला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी पाहणी करून सांगितले.तसेच आतापर्यंत कंधार तालुक्यात एकुण ५४७ मि.मी तर लोहा तालुक्यात ५०५ मि.मी. पाऊस पडला असल्याचे सांगितले.
