कंधार ; प्रतिनीधी
भारतीय संस्कृतीत सण-उत्सवास अन्यन्य साधारण महत्त्व असते.गेली आठ वर्षांपासून अविरत नऊव्या वर्षात पदार्पण करणारा शौर्याचा उपक्रम होय . विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सणाच्या निमित्त देशाभिमान जागृत करण्यासाठी सुवर्ण संधी असते.पण कंधारच्या सुंदर अक्षर कार्यशाळेनी अनोखी संकल्पना राबवून जिल्ह्यात नव्हे मराठवाडा विभागिय पातळीवर आपल्या उपक्रमाचा ठसा उमटवून अनोखी परंपरा राष्ट्रकुटाच्या ऐतिहासिक कंधार शहराने दिली आहे.
धागा शौर्य का। राखी अभिमान की॥” या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शासकीय गुत्तेदार म वैजनाथराव सादलापूरे तर प्रमुख अतिथी म्हणून वीर पत्नी कोमलताई काळे,
कंधार नापालिकेचे माजी उपनगराध्यक्ष जफरोदीन बावोद्दीन, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ इंद्राळे , पोलीस उपनिरीक्षक अरुण मुखेडकर , सेवारत भारतीय सैनिक हवालदार शिवहर कागणे भोजुचीवाडीकर, राहूल ढवळे कुरुळेकर, श्री शिवाजी विद्यालय बारुळचे मुख्याध्यापक अनिल वट्टमवार, विद्या विकास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजहंस शहापूरे, महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिगांबर वाघमारे ,
माजी मुख्याध्यापक खंडुराव पांडागळे, माजी सैनिक संघटनेचे ता.अध्यक्ष अर्जुनराव वाघमारे, पोचिराम कांबळे, पेन्सिल स्केच कलावंत व आदर्श शिक्षक प्रदीपकुमार सूर्यवंशी, पत्रकार एस डी बोटेवाड,कंधार पोलिस स्टेशन मधील कर्मचारी त्रिशला कांबळे, सौ. कांबळेताई,महिला पत्रकार रेखाताई गोरडवाड,
ज्या चिमुकल्यांनी महाराखी व सदिच्छा पत्र व राख्यांचे बॉक्स पॅकिंग करण्यासाठी सेवा देणाऱ्या चिमुकल्या कु.शिवानी मारोती गीते व प्रज्ञा मारोती गीते आणि शंकर तुळशीराम गीते यांनी सहभाग नोंदवून आपल्या राष्ट्रभक्तीची चुणुक दाखवली .या कालक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे दृष्टांत एमेकर यांनी सर्वांचे पुष्पहार घालून स्वागत केले. तर आभार दत्तात्रय एमेकर यांनी मानले .