ग्रामीण रुग्णालय कंधार येथे दिव्यांग व्यक्तीची तपासणी करून ११० दिव्यांगाना प्रमाणपत्रे वितरण

कंधार; प्रतिनिधी

कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यकांत लोणीकर यांनी जिल्हापरिषद गट निहाय सर्कलची विभागणी करून जनतेच्या सोयीसाठी दिव्यांची गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी ही मोहीम राबविली तालुक्यातील व शहरातील दिव्यांग नागरिकांना संगणकीय प्रणालीद्वारे बाहादरपुरा ,शिराढोण, कौठा, पेठवडज, कुरूळा, फुलवळ या जिल्हा परिषद गटातील दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या दिव्यांग लाभार्थ्याची तपासणी व प्रमाणपत्र वितरण समारंभ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

दि 8 जुलै ते 29 जुलै 2022 कालावधीत महाराष्ट्र शासन आरोग्य विभागामार्फत आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने दिव्यांग व्यक्तीची तपासणी व प्रमाणपत्र वितरण मोहीमचे आयोजन करण्यात आले होते.

कंधार तालुक्यातील व शहरातील दिव्यांग लाभार्थी यांनी ऑनलाईन नोंदणी व तपासणी करून घेतली व शिबिराचा लाभ घेतला . या शिबिरास तज्ञ डॉ.योगेश जायभाये (नेत्ररोग तज्ञ )
डॉ.विजय कागणे,डॉ.अंबुलगेकर (अस्थिव्यंग रोग तज्ञ)
डॉ.अभिनव ,डॉ.भिषेक कावरा (औषध वेधक)
डॉ.धाड,डॉ.सुधाकर बंडेवाड (बाल रोग तज्ञ )
डॉ.निबाळकर ,डॉ.रोहित ठक्करवाड (मनोविकृती तज्ञ), उपस्थित होते

कंधार तालुक्यातील व शहरातील एकूण रुग्ण संख्या 357 रुग्ण तपासणीसाठी आले होते त्या पैकी तपासणी करण्यात आलेल्या दिव्यांग अर्जाची संख्या एकूण -118 तसेच दिव्यांग प्रमाणपत्रासाठी पात्र लाभार्थी संख्या एकूण -110 तर अपात्र संख्या एकूण:-05
आणि नांदेड विष्णुपुरी येथे पाठवण्यात आलेले संदर्भित संख्या एकूण :-03 . अशी आहे अशी माहिती वैघकीय अधिक्षक सुर्यकात लोणीकर यांनी दिली .

1) अस्थिव्यंग विभाची एकूण लाभार्थी संख्या :-41.
अस्थिव्यंग विभागाची एकूण पात्र संख्या :-41.
अस्थिव्यंग विभागाची एकूण अपात्र संख्या:-00.
अस्थिव्यंग विभागाचे नांदेड विष्णुपुरी येथे पाठवण्यात आलेल्या संदर्भित केलेल्या लाभार्थ्यांची एकूण संख्या:-00.

2) नेत्र विभागाची एकूण लाभार्थी संख्या:-36.
नेत्र विभागाची एकूण पात्र संख्या:-28.
नेत्र विभागाचे एकूण अपात्र संख्या:-05.
नेत्र विभागाचे नांदेड विष्णुपुरी येथे पाठवण्यात आलेल्या संदर्भित केलेल्या लाभार्थ्याची एकूण संख्या:-03.

3) बाल रोगशास्त्र विभाग एकूण लाभार्थी संख्या:-07.
बाल रोगशास्त्र विभाग एकूण पात्र संख्या:-07.
बाल रोगशास्त्र एकूण अपात्र संख्या:-00.
बाल रोगशास्त्र नांदेड विष्णुपुरी येथे पाठवण्यात आलेल्या संदर्भित केलेल्या लाभार्थ्याची एकूण संख्या:-00.

4) औषध वेधक शास्त्र विभाग एकूण लाभार्थी संख्या:-19.
औषध वेधक शास्त्र विभाग एकूण पात्र संख्या:-19.
औषध वेधक एकूण अपात्र संख्या:-00.
औषध वेधक नांदेड विष्णुपुरी येथे पाठवण्यात आलेल्या संदर्भित केलेल्या लाभार्थ्याची एकूण संख्या:-00.

5) मनोविकृती शास्त्र विभाग एकूण लाभार्थी संख्या:-15.
मनोविकृती शास्त्र विभाग एकूण पात्र संख्या:-15.
मनोविकृती शास्त्र एकूण अपात्र संख्या:-00.
मनोविकृती शास्त्र नांदेड विष्णुपुरी येथे पाठवण्यात आलेल्या संदर्भित केलेल्या लाभार्थ्याची एकूण संख्या:-00.

दिव्यांग रुग्ण तपासणी मध्ये पात्र ठरलेल्या एकूण :-11 लाभार्थ्यांना आज दिनांक:- 29 जुलै 2022 रोजी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यकांत लोणीकर यांच्या शुभ हस्ते वितरित करण्यात आले.यावेळी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी दंत शल्यचिकित्सक डॉ.महेश पोकले, डॉ. संतोष पदमवार ,डॉ. शाहीन बेगम,डॉ. नम्रता ढोणे,डॉ.अरुणकुमार राठोड, डॉ.गजानन पवार,डॉ. निखहत फातेमा या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी खूप परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *