स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त फुलवळ येथील अंगणवाडीत पोषण आहार प्रदर्शन संपन्न.

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )

  भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजेच ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ८ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यालयाअंतर्गत ठिकठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात आले. त्याचाच भाग म्हणून एकात्मिक बालविकास कार्यालयाने सुद्धा नाविन्यपूर्ण नवनवीन उपक्रमात सहभागी होऊन ते यशस्वीपणे राबवले . त्यात याच अनुषंगाने कंधार तालुक्यातील फुलवळ येथे अंगणवाडी केंद्रात अन्य उपक्रमाबरोबरच पोषण आहार पाककृती प्रदर्शन भरवण्यात आले , यावेळी प्रामुख्याने सरपंच प्रतिनिधी नागनाथ मंगनाळे , ग्रामविकास अधिकारी आमृत मंगनाळे , ग्राम पंचायत सदस्य प्रवीण मंगनाळे , रहीम शेख , पत्रकार विश्वांभर बसवंते , परमेश्वर डांगे , दिगंबर डांगे , उमर शेख , पर्यवेक्षिका सौ. सी. जी. पोले यांच्यासह मातापालक , गरोदर माता , स्तनदा माता , किशोरवयीन मुली यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.




आझादी अमृत महोत्सव साजरा करतांना ता. ८ ऑगस्ट ते ता. १७ ऑगस्ट या कालावधीत दरदिवशी वेगवेगळे उपक्रम राबविले जावेत यासंदर्भात एकात्मिक बाल विकास सेवा योजना महिला व बाळ कल्याण विभागाच्या वतीने परिपत्रक काढून विविध उपक्रम ठरवून दिले होते , त्यानुसार ता. ८ ऑगस्ट रोजी महिलांची सभा घेऊन हर घर तिरंगा - हर घर पोषण ची सविस्तर माहिती देणे व सीबीई कार्यक्रमाचे आयोजन करणे , ता. ९ ऑगस्ट रोजी जनजागृती व पूर्वनियोजन करणे , ता.१० ऑगस्ट रोजी महिला मेळावे घेऊन अमृत महोत्सव ची माहिती देणे , ता. ११ ऑगस्ट रोजी अशाच मेळाव्यात मोबाईल चे दुष्परिणाम याबाबत माहिती देणे , ता. १२ ऑगस्ट रोजी घोषणा वाक्य व चित्रकला स्पर्धा घेणे , ता. १३ ऑगस्ट रोजी तिरंगा ध्वज लावणे व बाल गोपाळ पंगतीचे आयोजन करणे , ता. १४ व १५  ऑगस्ट रोजी विविध पाककृती पोषण आहार चे प्रदर्शन भरवून सविस्तर माहिती देणे , ता. १६ ऑगस्ट रोजी किशोरवयीन मुलींचे मेळावे घेऊन आरोग्य व चौरस आहारा बाबद मार्गदर्शन करणे , ता. १७ ऑगस्ट रोजी सर्व बालकांचे वजन घेणे व श्रेणी निश्चित करणे असे एकंदरीत कार्यक्रमांचे नियोजन होते , त्यानुसार फुलवळ येथील सर्व अंगणवाडी केंद्रात उपक्रम राबविण्यात आले.



  येथील मिनी अंगणवाडी केंद्र क्र. ५ येथील अंगणवाडी कार्यकर्ती वंदना मंगनाळे / होणराव यांच्यासह अंगणवाडी सेविका सुभद्राबाई फुलवळे , शोभाबई डांगे , गोरिबी शेख , संगीता जोंधळे , सुनीता जाधव , मदतनीस महानंदा देवकांबळे , कालिंदा गोधने , नंदिनी बसवंते या सर्वांनी एकत्र येऊन ता. १५ ऑगस्ट रोजी पोषण आहार पाककृती प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्यात विविध स्टॉल उभारून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ स्वतः बनवून ठेवले होते , जेणेकरुन उपस्थित माता पालक यांना त्यातून नवीन बोध मिळावा असाच उद्देश होता. 

  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका पोले मॅडम यांनी केले तर सूत्र संचलन पत्रकार धोंडीबा बोरगावे यांनी केले. यावेळी ग्रामविकास अधिकारी आमृत मंगनाळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या सर्व उपक्रमाचे कौतुक करत अंगणवाडी सेविकांचा उत्साह पाहून लवकरच फुलवळ येथे दोन अंगणवाडी केंद्र आयएसओ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. पत्रकार विश्वांभर बसवंते यांनीही मनोगत व्यक्त केले. शेवटी अंगणवाडी सेविका वंदना मंगनाळे / होणराव यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *