कंधार ; प्रतिनिधी
विश्व हिंदू परिषद वर्धापन दिनानिमित्त कंधार शहरात दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे ही स्पर्धा २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ,कंधार या ठिकाणी आयोजित केली आहे या स्पर्धेत मोठ्या संख्येने गोविंदा पथकाने सहभागी व्हावे असे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे
विश्व हिंदू परिषद वर्धापन दिनानिमित्त २००२ पासून कंधार शहरांमध्ये दहीहंडी स्पर्धेचे आयोजन हे मामडे ज्वेलर्स कंधारच्या वतीने करण्यात येते ,या वर्षी विसावे वे वर्ष दहीहंडी उत्सवाचे आहे, दोन वर्ष कोरोना काळात दहीहंडी उत्सव संपन्न होऊ शकला नाही परंतु दि २५ ऑगस्ट २०२२ गुरुवार रोजी मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सवाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक ,कंधार येथे विश्व हिंदू परिषद ,बजरंगदल कंधार च्या वतीने करण्यात आलेला आहे या स्पर्धे मध्ये विजय होणाऱ्या संघास ५१ हजार रुपये रोख बक्षीस व स्मृतिचिन्ह शिवा मामडे, मामडे ज्वेलर्स कंधार यांच्यावतीने देण्यात येणार आहे व सहभागी संघास हि प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे नांदेड जिल्ह्यातील सर्व गोविंदा पथकांनी या दहीहंडी उत्सवात सहभागी व्हावे अशी आव्हान प्रायोजक शिवा मामडे व आयोजक अड गंगाप्रसाद यन्नावार यांच्या वतीने करण्यात आले आहे.