संततधार पावसामुळे पिकांपेक्षा तणालाच बळकटी..

 

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )

कंधार तालुक्यात गेल्या कांहीं दिवसात कधी संततधार तर कधी अधूनमधून पडणारा पाऊस , ढगाळ वातावरण हे खरिपातील विविध पिकातील तणाला पोषक ठरत असून पिकात तणाने थैमान घातल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

खरिप हंगामात सुरवातीपासूनच सततच्या पावसामुळे पिकांनी कशीतरी तग धरली , काही ठिकाणी मुळालाच पाणी लागल्याने पिकात जोम राहिला नाही. महागडी बी-बियाणे, रासायनिक खतांची खरेदी करुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. त्यानंतर विविध पिकांच्या तणनाशकांच्या फवारणी करुन नाकी नवु आले परंतु सततच्या पावसाने यावर्षी सर्वप्रकारच्या तणाचा नाश झाला नाही तर अनेक ठिकाणी पावसाने पुन्हा दुसऱ्यांदा तण वाढू लागल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांना तणनाशक फवारुन पुन्हा खुरपणी करावी लागत आहे कारण पावसाने कोळपणी अनेकांना करताच आली नाही , शेतजमीन वापशावर आली नाही तर काही शेतकऱ्यांनी फुलात रिस्क घेऊन पुन्हा तणनाशके फवारणी करत आहेत आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यां समोर मजुरटंचाई व मजुरीवाढ ही नवी समस्या उभी राहिली.

त्यात अधूनमधून येणारा पाऊस व ढगाळ वातावरणाने जलसाठ्यात वाढ झाली खरी पण खरिपातील विविध पिकात तणाला पोषक स्थिती निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात तण वाढत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

यात सोयाबिन,ज्वारी,कापूस,तूर तीळ,कारळ,आदि पिकांचा समावेश आहे. पुन्हा पुन्हा डोके वर काढणाऱ्या तणाचा नाश कसा करावा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. एकदा खुरपणी किंवा तणनाशके फवारणी केल्यानंतर दुसऱ्यांदा तण वाढत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. उत्पन्नावर याचा परिणाम होऊन पुढील वर्षीही बी पडून तण आणखी वाढणारच असा शेतकर्यांचा अनुभव आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *