पोलीसांना हक्काचे सरकारी घर उपलब्ध करून द्यावे यासाठी पत्रकार मयुर कांबळे यांचे अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांना निवेदन

 

कंधार (ता.प्र.)

दि.23 ऑगस्ट रोजी पंचायत समिती येथिल सभागृहात गणेशोत्सवा निमित्त शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होती यावेळी पत्रकार मयुर कांबळे यांच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांना एक निवेदन देण्यात आले आहे.पोलीस बांधवाना मागेल तेंव्हा सुट्टी जाहीर करा पोलीस सुरक्षित तर आम्ही सुरक्षित असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की,दि.23 ऑगस्ट रोजी कंधार येथील पंचायत समिती कंधार येथील सभागृहात आगामी होणाऱ्या गणेशोत्सवा निमित्त शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी या बैठकीस नांदेड जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय अधिकारी मंडलिक,तहसीलदार मुंडे,उपविभागीय पोलीस अधिकारी मारोती थोरात,न.प.चे मुख्याधिकारी कारभारी दिवेकर व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी पत्रकार मयुर कांबळे यांनी माजी नगरसेवक शहाजीराजे नळगे व माजी उपनगर अध्यक्ष जफरोद्दिन बाहोद्दीन यांना घेऊन अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांना एक निवेदन दिले आहे .

 

त्यात त्यांनी असे नमूद केले आहे की,पोलीस बांधवाना बऱ्याच संकटांना तोंड देऊन सामाजिक बांधिलकी जोपासावी लागते,आपल्या जीवाची पर्वा न करता दिवसभर रात्री बेरात्री तटस्थ जागे राहुन,पाऊस,विज,वारा,ऊन अंगावर घेऊन समाजातील तळागाळातील लोकांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी सज्ज राहून सामाजिक सलोखा ठेवावा लागतो.लोकांच्या अडचणी सोडविता सोडविता पोलीस बांधवांनाच त्यांच्या परिवारा पासुन दुर राहुन त्यांनाच बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. पोलीस बांधव सर्वांच्या कामावर पडतात परंतु त्यांच्या कामावर कोणीच पडत नाहीत ही खरी परिस्थिती मी माझ्या डोळ्याने पहिली आहे.पोलिसांना कोणी वाईट संबोधले जाते तर कोणी चांगले संबोधले जाते कामा पुरते मामा या वाक्या प्रमाणे पोलीस बांधवांचा वापर केला जातो ही फार मोठी शोकांतिका आहे.भारताला स्वातंत्र्य मिळुन 75 वर्ष ओलांढली आहेत.व देश भरात आझादी का अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.परंतु आज देखील एखाद्या पोलीस बांधवाला घरगुती काम निघालं,कोणी घरचे बिमार पडले तर अर्जंट सुट्टी,साप्ताहिक सुट्टी त्यांना मिळत नाही. कुठं मिळाल त्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य म्हणुन आदरणीय अपर पोलीस अधीक्षक साहेब यांनी कंधार शहरा सह संबध नांदेड जिल्ह्यातील पोलीस बांधवानसाठी मागितलं तेंव्हा सुट्टी जाहीर करावी.व त्याच बरोबर कंधार शहरात व परिसरात कर्तव्य पार पाडत असनाऱ्या पोलीस बांधवांच्या राहण्याचा खुप मोठा प्रश्न उदभवत आहे.

 

 

येथील असलेली जुनी पोलीस वसाहत जमीनोउध्वस्त झाल्या कारणाने बऱ्याच कर्मचाऱ्यांना आपले कुटुंब घेऊन खाजगी जागी जावुन राहावे लागत आहे.खाजगी जागी राहात असताना अधिकारी व कर्मचारी यांना घर भाडे घरमालका कडून दुप्पट आकारणी केली जात आहे.त्यामुळे पोलिस बांधवांची होणारी आर्थिक पिळवणूक दूर करून पोलीस वसाहत चे नूतनीकरण करून त्यांना त्यांच्या हक्काचे सरकारी घर उपलब्ध करून देण्यात यावे.पोलीस सुरक्षित तर आम्ही सुरक्षित व पोलीस बांधवांची पगार वाढ करून त्यांना सहकार्य करावे असे त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.सदरील निवेदनाची तात्काळ दखल घेऊ असे आश्वासन यावेळी अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी मयुर कांबळे यांना दिले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *