कंधार ; प्रतिनिधी
जगतुंग समुद्र तलाव कट्टा व मन्याड नदी पुलावर सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांना भाजपा कंधार शहराध्यक्ष अँड गंगाप्रसाद यन्नावार यांनी दि .29 ऑगस्ट रोजी केली आहे .
कंधार शहरातील पुरातन असा जगतुंग सागर शेकडो वर्षापासून इतिहासाची साक्ष देत आज ही सुस्थितीत आहे. परंतू तलाव कट्टा परिसरामध्ये गणेश विसर्जन घाट, काळेश्वर मंदिर, श्री शिवाजी कॉलेज परिसर हा भाग तलाव लगत आहे. याठिकाणी धार्मिक विधी, गणेश विसर्जन, पर्यटन आदीसाठी नगरीक मोठयाप्रमाणावर येत असतात.
गणेश विसर्जन घाट परिसरामध्ये बॅरिकेटींग (सुरक्षा जाळी) बसवण्यात असलेली नाही त्यामुळे गणेश वसर्जन करण्यासाठी येणा-या भक्तांना धोका होण्याची शक्यता आहे. त्या आशयाचा सुचना फलक त्या ठिकाणी आवश्यक आहे.
श्री शिवाजी कॉलेज, शिवाजी नगर (नवरंगपुरा ) येथे पर्यटनाच्या दृष्टीने विकास कामे करून तलावावर घाट व पर्यटकांना बसण्यासाठी व्यवस्था केली आहे. परंतु हे काम अर्धवट केलेले आहे. तलावाची खोली व पाण्याचा धोका लक्षात घेता या ठिकाणी उभारण्यात आलेल्या छत्री व घाट पाय-यांनवर सुरक्षा जाळी बसवणे आवश्यक आहे. तसेच धोक्याची सुचना देणारे फलक ही लावण्यात आलेले नाही. धोक्याची सुचना देणारे फलक व सुरक्षा जाळी तात्काळ बसवावी व ते अर्धवट काम करणा-या कंत्राटदाराची चौकशी करून योग्यती कार्यवाही करण्यात यावी.
नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्गावर बहाद्दरपुरा स्थित पुल धोका दायक बनला आहे. त्या पुलावरील दोन्ही बाजूला सुरक्षा पाईप निघालेले आहेत, त्या सुरक्षा पाईची उंची कमी असल्याने धोका होण्याची, जीवीत हाणी होण्याची शक्यता आहे. त्या पुलाच्या सुरक्षतेच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे .
सदर बाबीचे गार्भीय लक्षात घेऊन तात्काळ येणारे धार्मिक उत्सव गणेशोत्सव, नवरात्रोत्सव या काळात मुर्ती विसर्जनासाठी जगतुंग सागर व मन्याड नदी या ठिकाणी नागरीक मोठया प्रमाणावर जातात त्या करीता वरिल उपाय योजना कराण्यात यावी अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष अँड गंगाप्रसाद यन्नावार यांनी केली आहे .
यावेळी भाजपा शहर चिटणीस मधुकर पाटील डांगे ,मार्केट कमिटी माजी संचालक श्रीराम जाधव , श्याम शिंदे , बाळू धुतमल , विजय सोनकांबळे रजत शहापूरे आदीची उपस्थिती होती.