घाटनांदुर (प्रतिनिधी ) कै. शंकरराव गुट्टे ग्रामीण महाविद्यालय धर्मापुरी येथील हिंदी विभागाच्या वतीने हिंदी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ.गजानन सवने हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. जे. पी.कोकणे हे होते .
यापुढे बोलताना प्रा. डॉ. गजानन सवने यांनी हिंदी भाषा ही भारतीयांचा स्वाभिमान आहे, हिंदी भाषा मुळेच भारत एक संघ टिकून आहे . तसेच हिंदी भाषा जनसामान्यांना अवगत असून पूर्ण भारतात बोलली जाते. त्यामुळे हिंदी जन मन की भाषा आहे ,असे प्रतिपादन केले . कार्यक्रमाच्या अध्यक्ष समारोपात प्रा. डॉ.कोकणे यानी हिंदी भाषाच्या प्रचार प्रसार करण्यासाठी अनेकांनी योगदान दिले आहे व देत आहेत असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. तुकाराम चाटे यांनी केले तर प्रस्ताविक प्रा.डॉ. व्ही. आर. जंगीटवार यांनी केले व आभार प्रा. डॉ.मदन नरवडे यांनी मानले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.