पत्रकाराचा आवाज म्हणजे, फेरोज मणियार
समाजाचा अरसा म्हणजे पत्रकार… समाजात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडी लोकांपर्यंत पोहचवणारा म्हणजे पत्रकार… अन्यायाला वाचा फोडणारा पत्रकार… आपल्या लेखणीने आणि आपल्या विचाराने नैराश्याच्या वातावरणाला आशेचे नवे किरण दाखवणारा म्हणजे पत्रकार… जे अंधारात असतील त्यांना प्रकाशात घेऊन जाणारा व प्रकाश दाखवणारा अर्थातच पत्रकार आहे. पण खरंच आज हे सारं काही मनमोकळ्या पद्धतीने पत्रकार करु शकतोय का….? मला तर मुळीच वाटतं नाही. आज अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांचे तोंड सहजपणे बंद केलं जात आहे मग ते पत्रकार असो वा एखादा सामाजिक कार्यकर्ता. जे खरं बोलण्याचा प्रयत्न करतील त्यांना एक दिवस शांत बसावंच लागतं नव्हे तर त्यांना शांत केलं जातं. त्यांचं तोंड बंद केलं जातं..लोकशाहीचा एक आधारस्तंभ म्हणून पाहिलं गेलेल्या पत्रकारिता वर थोडंस बोलावं वाटलं त्यातच लोहा येथील पत्रकार फेरोज मणियार यांना इंटरनॅशनल अच्युमेंट पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्रामीण भागातून सोशल इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपली एक ओळख निर्माण करणारे युट्युब चॅनेल च्या माध्यमातून जनसामान्याचे प्रश्न मांडणारे फिरोज मणियार यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत हा गौरव होय.
राजस्थान येथील सुप्रसिद्ध फिल्म प्रोडक्शन अंबालिका शास्त्री यांचे शक्ती फिल्म प्रोडक्शनच्या वतीने दिला जाणारा इंटरनॅशनल अच्युवमेंट अवॉर्ड २०२२ जयपुर चा बहुमान पुरस्कार लोहा फेरोज मणियार यांना जाहीर झाला असुन त्यांचा जन्म ०६/०५/१९९० रोजी लोहा येथे सामान्य कूटुंबात झाला त्यांचे शिक्षण बी.जे., एसटीडी, बीए एम सी जे, सुरू असून एम सी एन,एन टीव्ही इलेक्ट्रॅानिक्स मीडीया तसेच २०१५ जनतेचे मत हे साप्ताहिक चालू केले व ते प्रसिद्ध होत आहे
जनतेचे मत माझे मत साप्ताहिकांचे त्यांनी दैनिकात रूपांतर केले आहे नांदेड जिल्ह्यामध्ये दैनिक जनतेचे मत माझे मत लोकप्रिय होत आहे. त्यातूनच त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते आपल्या निर्भीड पत्रकारीतेतुन काम चालु केले आहे, करित आहेत तसेच २००९ पासून साप्ताहिक अब्दुल कलाम या वृत्त पत्रात तालुका प्रतिनिधी म्हणून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली.