राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा या विषयावर कंधार व लोहा कार्यालय प्रमुखांची बैठक

कंधार ;दि. 19 – 09-2022 रोजी राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा या विषयावर कंधार व लोहा तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुख यांची बैठक उपविभागीय अधिकारी डॉ शरद मंडलीक  यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

सदरील बैठकीत उपविभागीय अधिकारी व तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी सर्व कार्यालय प्रमुख यांना सेवा पंधरवडा राबविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

सर्वसामान्य जनतेची कामे विहित कालावधीत व्हावीत याकरीता राज्य शासनाने सन २०१५ मध्ये “आपले सरकार सेवा पोर्टल” सुरु केले आहे. त्या माध्यमातून जनतेची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण होणे अपेक्षित आहे. तथापि, सदर पोर्टलचा आढावा घेतला असता व मंत्रालय स्तरावर नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे अवलोकन केले असता अनेक प्रकरणी संबंधित नागरिकांचे अर्ज/तक्रारी यांचा सक्षम प्राधिका-यांकडून विहित कालमर्यादेमध्ये निपटारा होत नसल्याचे निदर्शनास आले .

या पार्श्वभूमीवर सर्व प्रलंबित संदर्भ/अर्ज/तक्रारी यांचा निपटारा करणेकरिता दि. १७ सप्टेंबर, २०२२ ते दि.२ ऑक्टोंबर, २०२२ या कालावधीत “सेवा पंधरवडा” राबविण्याचे शासनाने निश्चित केले आहे.

सदरील बैठकीत कंधार व लोहा तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुख उपस्थित होते. तसेच नायब तहसीलदार नयना कुलकर्णी , गटविकास अधिकारी सुदेश मांजरमकर , लोहा गटविकास अधिकारी , कंधार  गटशिक्षणाधिकारी संजय येरमे, लोहा गटशिक्षणाधिकारी अधिकारी रविंद्र सोनटक्के, नायब तहसीलदार संतोष कामटेकर  यांच्यासह विभाग प्रमुख गंगाधर टेंभुर्णीवार, मन्मथ थोटे व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *