आम्हाला शिकवू द्या,शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागु करावी यासह अन्य प्रलंबीत मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे .

  1. कंधार:-आम्हाला शिकवू द्या,शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागु करावी या आणि अन्य प्रलंबीत मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापूढे प्रदेशाध्यक्ष देविदास बस्वदे, प्रदेश संघटक चंद्रकांत मेकाले यांचे मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. निवासी जिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने देशभरातील शिक्षकांच्या प्रलंबीत प्रश्नावरून देशव्यापी आंदोलनाचा कालबद्ध कार्यक्रम राबवला असून चापूर्वी देशव्यापी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली आहे. दि.२४रोजी देशभरतील सर्व जिल्हाकचेरी समोर लक्षवेधी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले.

यावेळी प्रदेश संघटक चंद्रकांत मेकाले, जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, सरचिटणीस प्रल्हाद राठोड, कार्याध्यक्ष सुधाकर खडके, माणिक कदम, जयवंत काळे, माणिक कदम, बी डी देशमुख, ओमप्रकाश बलदवा, संतोष कदम, तुका पाटील, शिवाजी शिंदे, शेख मुतरज, जी टी कदम, बालाजी कवटीकवार, माधव परगेवार, संजीव मानकरी, अशोक सकनूरकर, व्यंकटेश भोगाजे, रवि ढगे सौ मंगला जिगळे, आदी आखील महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *