फुलवळ येथे लम्पि त्वचा रोग नियंत्रणासाठी लसीकरणाला पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

फुलवळ  ( धोंडीबा बोरगावे )

          आज ता. २४ सप्टेंबर रोजी फुलवळ येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात लम्पि त्वचा रोग नियंत्रणासाठी गायवर्गीय जवळपास २०० जनावरांना रोगप्रतिबंधक लसीकरण करण्यात आले यावेळी पशुपालकांनी आपापली जनावरे घेऊन येऊन  उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

      सदर लसीकरण हे गाय वर्गीय  जनावरे म्हणजे गाय, बैल व ४ महिन्यांपूढील वासरे यांना करण्यात येणार येत आहे. तेंव्हा  गावातील संपूर्ण गाय वर्गीय  जनावरे असणाऱ्या पशुपालकांनी आपल्या पशुधनास लसीकरण करून घ्यावे असे आवाहन येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. दिनेश रामपुरे यांनी व ग्राम पंचायत कार्यालय फुलवळ यांनी गावात दवंडी , वॉट्सअप द्वारे मॅसेज व गावातील मंदिरावरील लाऊडस्पीकर वरून पशुपालकात जनजागृती केले होते.

 

    त्यावरून गावातील पशुपालकांनी आपापल्या  जनावरांना लसीकरण करून घेण्यासाठी एकच गर्दी केली होती.

आज ता. २४ सप्टेंबर रोज शनिवारी सकाळी ६:३० वाजल्यापासून जनावरांना लसीकरण चालू करण्यात आले होते. सकाळी ६:३० ते सकाळी १०:०० वाजेपर्यंत एकूण १९४  जनावरांना लसीकरण पूर्ण झाल्याचे डॉ. दिनेश रामपुरे यांनी सांगितले असून उर्वरित पशुपालकांनी सुद्धा लवकरात लवकर आपापल्या जनावरांना लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करत सदर आजार हा संसर्गजन्य असल्याने वेळीच काळजी घेणे आवश्यक असल्याचे ही सांगितले.

 

       सदर लसीकरण पूर्ण करण्यासाठी डॉ. दिनेश रामपुरे सोबतच सेवानिवृत्त पशुधन पर्यवेक्षक डॉ. डी.एन. केंद्रे , परिचर डी.डी.केंद्रे , सहाय्यक साहेबराव देवकांबळे व शंकर डिगोळे यांनी सेवा दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *