बबलु शेख बारुळकर हे सामाजिक बांधिलकी जपणारा दृष्ठा पत्रकार असून प्रतेक समाजाच्या प्रश्नासाठी सातत्याने आग्रही राहणारा ग्रामीण भागातील धुरंदर पत्रकार म्हणून ओळख.
वयाच्या २० व्या वर्षी पत्रकार क्षेत्रात पाऊल ठेऊन आपल्या कारकिर्दीची सुरुवात बबलू शेख यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत अनेकांना न्याय मिळवून देत जनमाणसात वेगळी ओळख निर्माण केली. सबंध वाचकांच्या प्रेरणा मिळवत अखंड सेवा देणारे पत्रकार म्हणून आपली वेगळी ओळख कंधार तालुक्यासह जिल्हाभर निर्माण केली. आता उमरी येथील लोकनेते वाघलवाडा साखर कारखान्याचे चेअरमन मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांचे खासगी स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहत आहेत.कंधार संरक्षण समिती संघाचा अध्यक्ष म्हणून सतत चार वर्षापासून पदभार सांभाळत आपल्या सर्व सहकारी पत्रकार बंधावसाठी प्रयत्न शिल राहणारे म्हणून परिचित.
अशा या लढवय्या पत्रकाराचा 7 ऑक्टोबर हा जन्मदिवस होय.शेख बबलु बारुळकर यांचा जन्म 7 आक्टोबर 1991 रोजी तालुक्यातील बारुळ येथे झाला. त्यांचे शिक्षण एम. ए. बी. एड् पर्यंत झाले आहे. त्यांनी 23जानेवारी 2014 रोजी नांदेड न्यूज लाईव्हच्या माध्यमातून पत्रकारीतेला सुरुऊ केली. 2017 पर्यंत प्रतिनिधी म्हणून काम केले. 2017 मध्ये माझा नांदेड लाईव्ह या नावाने स्वतःचे वेबपोर्टल काढले. आजपर्यंत 28 लाख वाचकांनी पाहिले आहे. या सोशल माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. तसेच जनमाणसात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
बबलु शेख म्हणजे एक अजब रसायणच आहे. हो अजब रसायण या करीता म्हणतो की, लहाणपणापासून अतिशय हुशार व सामान्य कुटुंबात जन्म घेऊन स्वतःची जिल्हाभर ओळख निर्माण केली.
वडिल शेख आली नवाज यांची एक छोटीशी पान टपरी आहे.काम करत असताना कितीही जिम्मेदारी अंगावर पडली. तरीही या माणसाच्या अंगातील सामाजिक कार्याची भावना, ओढ कमी झालीच नाही. एवढेच नाही, तर आपल्या गावासाठी काही ना काही नवनवीन करता येते का हे आजही त्याच उमेदीने ते काम करतात. बारूळ येथील बेरोजगार तरुणांसाठी त्यांच्या हाताला काम देण्यासाठी त्यांनी तीन तरुणांना खासगी नोकरी लावली. हे सर्व करत असताना जनसामान्यांची सोशल मीडियावर व्यथा मांडणारे एक परखड संपादक आहेत. अनेकवेळा न्यायाप्रती. अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे. यात तिळमात्र शंका नाही. खरच ग्रामीण भागात राहुंन कोणताही राजकीय वारसा नसताना. कोणतीही राजकीय भुक मनासी नसता, समाजा प्रती प्रांजळ काम करण्याची भावना असणारा हा आणि हाच माणुस असु शकतो. म्हणुनच या माणसाला आजपर्यंत मिळालेले अनेक पुरस्कार हे अभिमानास्पदच आहेत.
राज्याचे माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी त्यांच्या अंगातील सुप्त गुण ओळखले आणि त्यांच्या सोबत काम करण्याची संधी दिली,2017 ते 2019 पर्यंत माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि जि.प.सदस्या डॉ.सौ.मीनल पाटील खतगावकर यांच्या विचार धारेत ते काम करत राहिले,त्या नंतर खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कन्या माजी जि.प.सदस्या सौ.प्रणिता देवरे चिखलीकर यांच्या सोबत कामाची सुरुवात केली बरेच दिवस त्यांनी चिखलीकर ताईचे प्रसिद्धीचे काम पाहिले.
आजपर्यंत त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत अनेक सन्मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले.मूकनायक सेवाभावी संस्था मांजरमच्या वतीने दिला जाणारा युवा जीवनगौरव पुरस्कार २०२० ला मिळाला.मौलाना आझाद फाऊंडेशनचा सन्मानाचा पुरस्कार,कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनेक वेळा कोरोना योध्दा म्हणुन सन्मानित करण्यात आले.
बबलु शेख जातीने मुस्लिम असून त्यांच्यावर शिव,शाहू,फुले आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा आहे.ते एक कुशल प्रवक्ते आहेत.एक अभ्यासू वृत्ती त्यांच्यात आहे सर्व धर्म समभाव ची भावना त्यांच्या कृत्यातून नेहमी दिसते,
आज त्यांचे काम पाहून शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी खासगी स्वीय सहाय्यक म्हणून आपल्या सोबत घेऊन चालत आहेत.
कवळे गुरुजी एक चाणाक्ष व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत,ते प्रतेक व्यक्ती हिऱ्या प्रमाणे शोधतात त्यांना हा बबलु शेख हिऱ्या प्रमाणे भेटला ते त्यांना सावली प्रमाणे जपत आहेत,नायगाव, उमरी, धर्माबाद,बिलोली,भोकर,या तालुक्यात त्यांचा चांगला परिचय आहे येत्या काळात कवळे गुरुजी यांना त्यांचा चांगला फायदा होईल यात मात्र तीळ मात्र शंका नाही,एक कुशल संघटन करण्याची त्यांचे कडे एक कलाच आहे,ते एकदम प्रतेक व्यक्तीला आपलंसं बनवून टाकतात,आत्ता पत्रकार आणि एक लढवय्या स्वीस सहायक म्हणून एक वेगळी भूमिका साकारत असताना ते आपल्याला पाहायला मिळत आहे.
अत्यंत स्मित भाषी,मनमिळाऊ स्वभाव आणि प्रचंड समाजकार्याची आवड या तिन्ही गोष्टी एका माणसात असणं खूप अवघड असतं. मुस्लिम समाजात जन्म घेऊन ही त्यांची एक गोष्ट मला प्रचंड आवडली की त्यांनी आपल्या भावाच्या लग्नाची लग्नपत्रिका ही प्रथमच मराठीतून छापली होती. ही भयानक कल्पना एखाद्या सामाजिक क्षेत्रात प्रचंड विचार करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यालाच सुचते असं म्हणावं लागेल. पत्रिकेवर मुलाचं नाव लिहिताना नुरेचष्म असं न छापता चिरंजीव असं मी त्या पत्रिकेवर जेव्हा वाचलं, तेव्हा क्षणभर माझ्या डोक्यामध्ये या व्यक्तीबद्दल विचारांचं काहूर माजलं. सामान्य घरातील माणूसच हा इतिहास घडवण्यासाठी, इतिहासाच्या पानावर आपलं नाव लिहिण्यासाठी किंवा मागील इतिहास सांगत असताना त्या इतिहासात आपलं नाव येण्यासाठी खारीच्या वाटेचा प्रयत्न नेहमीच करत असतो. त्याचे मुस्लिम मित्र कमी पण त्याचं राहणीमान आणि त्याचा जास्त सहवास हा हिंदू धर्मातील लोकांसोबत आहे.
सर्व समाजांना माणूस नावाच्या चाकोरी मध्ये पाहण्याचा मोठा दृष्टिकोन या माणसाच्या आंगांमध्ये भिनला आहे. त्यामुळे बबलूला एकदा भेटलेला माणूस त्याच्यापासून आयुष्यभर कधीच दुरावत नाही ही त्याची सगळ्यात मोठी ओळख आहे. अशा बहुरंगी,समाज उपयोगी आणि सामाजिक कार्यकर्त्यास माझ्या वतीने वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा…