कंधार ; दीपोत्सव आनंदी पर्वाची खरी चाहूल कोजागीरी पौर्णिमेस लागते.आकाश कंदिल लावण्याची सुरुवात त्या दिवसा पासून त्रिपुरारी पौर्णिमेस दीपोत्सवाची नदी, तलाव यात दीप सोडून सांगता करतात.यंदा कंधार शहराच्या शिवाजीनगरातील एमेकर परिवाराच्या “गोकुळ”निवासस्थानी सुंदर अक्षर कार्यशाळेच्या सृजनशीलच्या हस्तकलेतून रंगीत ड्राॅईंग पेपरचा वापर करुन तिरंगी आकाश कंदिल तयार करुन लावला आहे.देशाचा अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला.आता हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवास आरंभ झाला आहे म्हणून हा आकाशदीप तयार करण्यात आला.
गोपाळसुत दत्तात्रय एमेकर