सध्या आपल्या भारत देशात दीपोत्सवाचे वारे वाहू लागले आहे अगदी दोन दिवसावर सर्वात मोठा दिवाळी सण येवून ठेपला आहे.पण क्रांतिभुवन बहाद्दरपुर येथील शांतीघाट बहाद्दरपुरा मन्याड नदीवरील पुल शिमगोत्सव साजरा करत बोंब मारते आहे.
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पं.जवाहरलाल जवाहरलाल नेहरु यांचे देहावसन 1964 साली झाले.दिवंगत नेहरुजींच्या ईच्छेनुसार माझी रक्षा(राख)भारतातील वाहत्या नदीत अन् शेतकर्यांच्या शेतीत टाकावे.अशी अंतीम इच्छा व्यक्त केली.त्यावेळी या कंधार शहरातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक सैनिक दिवंगत अनंतरावजी मामडे साहेब यांनी उपोषण करुन पं नेहरुजींची राख सत्याग्रह करुन जिद्दीने मिळविली.एक इंजेक्शनच्या काचेच्या बाटलीत ती राख आणली तत्कालीन नांदेड जि.प.नांदेडचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत श्यामरावजी कदम साहेब तत्कालीन कंधार विधानसभेचे तत्कालीन आमदार डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या संकल्पनेतून भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब यांच्या सहकार्यातून मन्याड नदीत पं.नेहरुजींची रक्षा विसर्जित केली.तेंव्हापासून या घाटाला शांतीघाट असे नामकरण करण्यात आले.
याच मन्याड नदीत मला बांधण्याची मंजुरी मिळाली.मी पुर्वी फक्त नऊ फुटाचा होतो.त्यावेळचे अभियंता साहेब यांनी तत्कालीन आमदार डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांना म्हटले.ही रुंदी काहींच कामाची नाही. जर ही रुंदी वीस फुटाची केली तर रहदारी वाढण्यास मदत होईल अन्यथा पादाचारी होईल. त्यावेळी मुख्यमंत्री अंतुले साहेब यांना विनंती केल्यास रुंदी नक्कीच वाढवून मिळेल.तेव्हाच राज्याची राजधानी मुंबई येथे आमदार साहेब डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब व भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब मुख्यमंत्री अंतुले साहेब यांना भेटण्यासाठी गेले.पण मुंबईला पोहंचताच मुख्यमंत्री महाबळेश्वर येथे विश्रांतीसाठी गेले असे कळले.तेंव्हा डाॅ.भाई केशवराव धोंडगे व भाई गुरुनाथराव कुरुडे ही जोडगोळी मुख्यमंत्र्यांना भेटण्यास महाबळेश्वर येथे गेले.पण रात्रीचा मुक्काम एस.टी.स्टॅडवरच केला.सकाळी सहा वाजता.मुख्यमंत्री अंतुले साहेब यांना भेटले.एवढ्या लवकर येथे कसे आलात.तेव्हा भाई साहेब यांनी सगळी हकिकत सांगताच मुख्यमंत्री महोदय अनाक् झाले.तुम्हास मिळत असतांना तुम्ही खुपच त्रास घेतला.
मुख्यमंत्र्यांनी अचानक भेटीस येण्याचे विचारले.तेंव्हा आमच्या शांतीघाट बहाद्दरपुरा येथील मन्याड नदीवरील मी नऊ फुट मंजुर झालेला होतो.तो वाढवून वीस फुटी करण्यासाठी मन्याड खोर्यातील लाल खंदारी कृष्ण-सुदामा जोडीने बसस्थानकात रात्र मच्छरांच्या खाईत काढून मेहनतीने माझी निर्मिती केली खरी पण आज घडीला दीपोत्सवाची सर्वत्र जोरदार तयारी सुरु असतांना मला मात्र बोंब मारुन शिमगोत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे.
भारत देशाच्या वर्तमानी महामहिम पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी सरकार मधील रस्ते बांधकाम मंत्री मा.नितीन गडकरी साहेब यांच्या कल्पकतेतून नांदेड-बीदर द्रुतगती महामार्गावर सी.सी.माध्यम वापरुन मजबुत होत असतांना माझी बकाल अवस्था पाहून मज-मलाच शरमेने मान खाली घालून जिर्ण अवस्थेचे जिणं जगावे लागत आहे.गेली दोन-तीन वर्षापासून माझ्यावरून अनेक अवजड वाहनांच्या ये-जा करण्यामुळे मी पुरता इतिहासात जमा होण्याच्या परिस्थितीत जीवन जगत आहे.याचे मला दुःख आहेच पण त्याआधीच कोणत्याही वाहानाला अगर नागरिकांना जलसमाधी न मिळावी या साठी मी देवपाण्यात ठेवले आहेत.माझ्या शरीरावर सहा व आठ इंची खड्डे पडली आहेत.बाजुचे सुरक्षा कठडे फक्त नावालाच लाईटचे पोल्स फक्त शोभे पुरते उरली आहेत.माझ्या वरुन दळवळाचे कोणतेही साधन ये-जा करतांना प्रत्येक प्रवासी मुखातून मला नाही,पण माझी अवस्था पाहून जो जबाबदार आहे त्याला शिव्यांची लाखोळी वाहतांना मी जाम वैतागून गेलो.माझ्यावर अगणित खड्डे पडल्याने अनेकांना मान,पाठ,कंबर दुखीचा हमखास सुरु झाला आहे.फक्त गळ लावून माशांना पकडणाऱ्यांना जीव मुठीत धरून माझ्या कडेवर बसतांना भीती वाटत आहे.शेतकरी राजा आपली गुरं-ढोरं घरुन शेताकडे ने-आण करतांना त्रास नाहक सहन करावा लागतो आहे.श्री कालप्रियनाथ केशवेश्वर लिंग मंदिर व माझ्यात अनेकदा खिन्न होवून फक्त चर्चा करण्या शिवाय आमच्याकडे पर्याय नाही.हे सर्व मला श्वास रोखून कोणतीही अप्रिय घटना घडू नयेत म्हणून लाजीरवाणे जीणे जगतो आहे.अनेक लेखनी बहाद्दर पत्रकार मित्रांनी माझी व्यथा वर्तमानपत्रातून मांडून शासनाच्या डोळ्यात अक्षरक्षः अंजणं झाले.पण गेंड्याच्या कातडीचे शासनकर्ते माझ्याकडे ढुंकून पाहत नाही.
अनेक संघटना,पक्ष,सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक प्रयत्न केले पण त्याला यश आले नाही.त्यांना सत्ताधिशांनी केराची टोपली दाखवली.अनेक सत्याग्रह, निवेदने,बेसरमाची वृक्षलागवड करुन निषेध नोंदविला पण प्रयत्न व्यर्थ गेले.सध्या दीपावली सणाचे वारे सर्वत्र वाहू लागले पण माझी हेळसांड काही थांबेना! म्हणून क्रांतिभुवन बहाद्दरपुरा या माझ्या नगरीतील शल्यकार गोपाळसुत-दत्तात्रय एमेकर गुरुजी यांनी दीपोत्सवात माझा बोंब मारू शिमगोत्सवाची बोंब बोलकं शल्य यातूनच व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला.
बोंब मारा ऽऽऽ बोंब! मारी शिमग्याची बोंब ॥
माझी बेहाल काही थांबेना,
शासन माझ्याकडं लक्ष देईना,
थुंका पॉलिश काही थांबेना,
मला पर्याय खरच होईना!
बोंब!दीपोत्सवातच शिमग्याची बोंब!!
बोंब मारा बोंब! मारी शिमग्याची बोंब!!
या कवितेने दीपोत्सवात शिमगोत्सव मला साजरा करण्याची वेळ आली.
बघुया माझ्या बकाल अवस्था पाहून शासनास जाग येते का? सरकार कुंभकर्णी झोपेचे सोंग घेते का ?हे दीपोत्सवात पाहायचे आहे.माझ्या आवस्थेचे क्षणचित्रे क्रांतिभुवन बहाद्दरपुरा नगरीतील माझ्यावर प्रेम करणारा नवयुवक यांनी आज माझ्याशी विचारपुस करुन आपल्या मोबाईलमध्ये माझी बेहाल टिपूण घेतली.त्यावेळी मी त्यांच्या संवाद साधुन दीपोत्सवात शिमगोत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे.