कंधार ; मतदारसंघात गेल्या काही महिन्यात अतिवृष्टीने मतदारसंघातील खरीप हंगामातील ज्वारी ,उडीद, सोयाबीन, कापूस ,तुर पिकासह इतर खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले असल्याने मतदारसंघातील शेतकरी राजावर अस्मानी सुलतानी संकट ओढवल्याच्या पार्श्वभूमीवर लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे व शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी वेळोवेळी वरिष्ठ स्तरावर तळमळीने पाठपुरावा केला होता. आमदार शिंदे व आशाताईच्या प्रयत्नाला यश आले
असून पिक विमा कंपनीने अखेर मतदारसंघातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांचा पिक विमा मंजूर केला आहे लोहा-कंधार मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट विम्याची रक्कम जमा होणार असल्याची माहिती लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी दिली, जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मतदार संघातील खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले होते कापूस,सोयाबीन,तूर आणि ज्वारी पिकासाठी हा विमा शेतकऱ्यांनी भरला होता अखेर विमा कंपनीने बाधित शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर केला आहे.
लोहा तालुक्यासाठी 43 कोटी 2 लाख रुपये तर कंधार तालुक्यासाठी 39 कोटी 16 लाख रुपयाचा पिक विमा मंजूर करण्यात आला आहे, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विम्याचे पैसे लवकरच जमा होणार असल्याचे लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी सांगितले.