कंधार ; विशेष सहाय्य योजना अंतर्गत सामाजिक अर्थ सहाय्य योजनेच्या संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ विधवा दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेच्या कंधार तालुक्यातील 5439 , दिव्यांग,दुर्धर आजार,अनाथ,विधवा,वृद्ध, निराधार योजनेच्या लाभार्थींना दिवाळीपुर्वी दि 21 आँक्टोंबर रोजी खात्यावर अर्थसहाय्य संजय गांधी शाखा तहसिल कार्यालय कंधार कडुन जमा करण्यात आले .
निराधार लाभार्थी कडून पैसे जमा झाल्याचे व पैसे उचलल्याचे माहीती मिळाल्याने तालुका प्रशासनाचे मुख्यालय तहसिल कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागाने केलेल्या पाठपुरावा व प्रयत्नाला यश आल्याने समाधान व्यक्त केले आहे .
मा.जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,निवासी जिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, विशेष अर्थसहाय्य विभाग प्रमुख तहसिलदार ज्योती चव्हाण, सहाय्यक माधुरी शेळके यांनी आवश्यक अनुदान व मार्गदर्शन केले मा उपविभागीय अधिकारी डॉ शरद मंडलिक यांचे मार्गदर्शन, मा तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांचे मार्गदर्शन, पाठपुरावा व समन्वय साधून पुरेसे अनुदान उपलब्ध करून घेतले.. उपकोषागार अधिकारी सुनीता नरवाडे व त्यांचे सहकारी मुंडे व सुर्य यांनी वेळेवर देयके मंजुर करुन दिली.
स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कंधार चे मँनेजर श्री विलास रिनायक यांनी सर्व बँक व पोस्ट यांना तात्काळ निधी ट्रान्स्फर करून दिला व त्यांच्या बँक खातेधारक निराधार लाभार्थींच्या खात्यावर लगेचच पैसे जमा केले त्याबद्दल व नांदेड पोस्ट पेमेंट बॅंकेचे वरीष्ठ व्यवस्थापक श्री सत्यप्रभु, व्यवस्थापक प्रगत वानखेडे यांनी तात्काळ लाभार्थींच्या खात्यावर पैसे जमा केले त्याबद्दल तहसिल कार्यालय कंधार संजय गांधी शाखेच्या वतीने आभार.
अनुदानाची रक्कम बँक/पोस्ट अधिकृत कर्मचारी कडुन तपासून उचल करावी त्याची पावती घ्यावी असे आवाहन तहसीलदार व्यंकटेश मुंडे, संजय गांधी निराधार शाखेचे नायब तहसीलदार संतोष कामठेकर,पेशकार अविनाश पानपट्टे,माधव पवार, संजय गांधी निराधार शाखेचे महसुल सहायक बारकुजी मोरे आँपरेटर एस.टोपारे यांनी केले आहे.