धर्मापुरी ( प्रा भगवान आमलापुरे ) येथील कै शं गु ग्रामीण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दि १९ आक्टो २२ रोजी आय क्यु ए सी ची बैठक आणि इतर अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्राचार्य डॉ टी एल होळंबे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
यात प्रथमतः प्रथम सत्राचा विभाग वाईज आढावा घेण्यात आला.भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा एस जी मुंडे यांनी नवीन शैक्षणिक धोरणावर अभ्यासपुर्ण व्याख्यान दिले.त्यानंतर डॉ पी डी मामडगे आणि डॉ जे पी कोकणे यांनी केंद्रीय युवक महोत्सव २२ मधील आठवणी आणि अनुभव कथन केले. शेवटी प्राचार्यांनी ‘ जीवन समजून घेतांना ‘ या गौर गोपाल दास लिखित पुस्तकाचे १० मिनिटं अभिवाचन केले. या सर्व कार्यक्रमाच्या पुर्वी रासेयो तर्फे’ प्लास्टिक मुक्त परिसर ‘ अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. डॉ आर के गजलवार यांनी सुत्रसंचालन तर प्रा अविनाश मुंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. एकमेकांना शुभ दिपावलीच्या शुभेच्छा देऊन ही बैठक संपली.